×

मध्यधुंद अवस्थेत सापडली प्रसिद्ध अभिनेत्री, पोलिसांना शिवीगाळ करून रस्त्यावर जाणाऱ्यांवर चालवली गाडी

अभिनेत्री काव्या थापरला (Kavya Thapar) जुहू पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर दारू पिऊन गाडी चालवण्याचा आणि एका व्यक्तीला गाडीची धडक मारल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अभिनेत्रीला थांबवल्यावर तिने पोलिसांशी वाद घातला आणि अपशब्दही वापरले. सध्या तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kavya Thapar (@kavyathapar20)

 

काव्या प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसते. तिचा जन्म २० ऑगस्ट १९९५ रोजी महाराष्ट्रात झाला. तिने बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच, ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. (actress kavya thapar was arrested charges of engaging in a scuffle)

View this post on Instagram

A post shared by Kavya Thapar (@kavyathapar20)

काव्या पहिल्यांदा ‘तत्काल’ या हिंदी शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती. पतंजली, मेक माय ट्रिप अशा अनेक मोठ्या ब्रँडसाठी तिने जाहिराती केल्या आहेत. तिचा पहिला तेलगू चित्रपट ‘Ee Maaya Peremito’ हा २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. काव्या तिच्या हॉट फोटोशूटसाठी ओळखली जाते. ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे.

हेही वाचा :

हेही पाहा-

Latest Post