बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी ही तिच्या अभिनयासाठी आणि तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. कियारा सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. कियारा बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी आहे. कियारा तिच्या लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवण्यातही कमी नाही. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री अनेकदा स्टायलिश स्टाईलमध्ये दिसतात. मात्र आता कियाराने तिच्या जबरदस्त लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
कियाराने (Kiara Advani) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती फोटोशूटसाठी पोझ देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये कियाराची स्टाईल आणि लूक दोन्ही खूपच किलर आहे. व्हिडिओमध्ये कियाराने सिल्व्हर कलरचा अतिशय सुंदर बॅकलेस गाऊन परिधान केला आहे. व्हिडिओमध्ये कियारा कॅमेराकडे पाहत पोझ देत आहे. तिने ड्रेससोबत रेड कलरच्या प्रिंटेड हील्स सॅंडल घातला आहेत.
अवघ्या तासाभरात कियाराचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्याला दीड लाखांहून अधिक युजर्सनी लाईक केले आहे. इतकंच नाही, तर कियाराचे चाहते आणि फिल्म स्टार्स व्हिडिओवर बिनधास्त कमेंट करत आहेत. प्रत्येकजण कियाराच्या कौतुकाचे पूल बांधत आहे.
डिझायनर मनीष मल्होत्राने आपल्या कमेंटमध्ये बरेच फायर इमोजी शेअर केले आणि “wooooo” लिहिले आहे. अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने लिहिले की, “ओफ्फ, तू आणि तो ड्रेस.” अनेक चाहत्यांनी फायर, हार्ट आणि फटाक्यांची इमोजी शेअर करून कियाराचे कौतुक केले आहे. एका चाहत्याने गमतीने विचारले की, “तुला थंडी वाजत नाही का.”
कियाराच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कियारासोबत वरुण धवन दिसणार आहे. चित्रपटात अनिल कपूर, नीतू कपूर आणि प्राजक्ता कोळी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय कियारा आडवाणी कार्तिक आर्यनसोबत ‘भूल भुलैया २’ या चित्रपटात दिसणार आहे. तब्बूही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
हेही वाचा –
- मलायका अरोरा मुलगा अरहानसोबत दिसली स्टायलिश लूकमध्ये, चाहते म्हणाले ‘ही आई आहे की बहीण?’
- वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन्स देऊन ‘या’ अभिनेत्रींनी आजमवले नशीब, त्यानंतर मिळवले भरपूर काम
- वहिनीसाहेबांनी मुलासोबत केला भन्नाट डान्स, धनश्री काडगावकरच्या व्हिडिओवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव