बाॅलिवूडची लाेकप्रिय अभिनेत्री क्रिती सेनन गेल्या दिवसात साेशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती साेशल मीडियाच्या माध्यमातून कायमच चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकतेच करण जाेहरचा शाे ‘कॉफी विद करण 7’मध्ये क्रितीने प्रभासला फाेन केला हाेता. तेव्हापासून प्रत्येक ठिकाणी क्रिती आणि प्रभासच्या अफेअरची चर्चा आहे. चाहतेही या हाॅट कपलला साेबत बघण्यासाठी उत्साही आहेत.
पण तुम्हाला माहित आहे का? क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि प्रभास (Prabhas) ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘आदिपुरुष’च्या सेटवर पहिल्याच दिवशी क्रिती आणि प्रभासमध्ये जबरदस्त बाँडिंग झाली. सेटवर प्रत्येकाला आश्चर्य वाटायचे की, प्रभास इतका लाजाळू असला, तरी ताे क्रितीसाेबत कसा काय इतका खुलून बाेलत आहे. सेटवर दाेघेही एकमेकांसाेबत बाेलण्यात फार व्यस्त असतात. असे म्हटले जाते की, क्रिती आणि प्रभासची मैत्री फार खास आहे.
असे वाटते की, क्रिती सेनन आणि प्रभास जगासमाेर आपल्या नात्याचा खुलासा करायला आणिखी वेळ घेऊ इच्छितात. माध्यमांतील वृत्तांनुसार, प्रभास आणि क्रितीला सेटवर साेबत वेळ घालवणे आवडते. महिन्याभरापूर्वी ‘आदिपुरुष’चे शूटिंग पूर्ण झाले असले, तरी दाेघांमध्ये मैत्री कायम आहे. क्रिती आणि प्रभास कायमच एकमेकांना काॅल आणि मॅसेज करत असतात. असे म्हटले जाते की, दोघांनाही एकमेकांसाठी जास्त भावना आहेत.
प्रभास आणि क्रिती यांची जाेडी रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘आदिपुरुष’ चित्रपटामध्ये प्रभास ‘राम’ची भूमिका, तर क्रिती ‘सीता’ची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट पुढल्या वर्षी 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. दाेघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री बघायला चाहते खूप उत्सुक आहेत.
View this post on Instagram
क्रिती तिच्या सहा वर्षांच्या करिअरमध्ये ‘बरेली की बर्फी’, ‘लुका छुपी’, ‘दिलवाले’, ‘राबता’, ‘अर्जुन पटियाला’, ‘पानिपत’, ‘हाऊसफुल्ल ४’ आदी एकूण अकरा चित्रपटांमध्ये झळकली. यासोबतच तिने अनेक सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. तसेच ती काही म्युझिक व्हिडिओमध्ये देखील झळकली आहे. अलिकडेच क्रितीचा ‘मिमी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. जाे चाहत्याच्या पसंतीस उतरला. आगामी काळात ती ‘बच्चन पांडे’, ‘भेडिया’, ‘आदिपुरुष’ या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘विक्रम वेधा’च्या नवीन गाण्याचा आख्ख्या मार्केटमध्ये राडा, ऋतिकचा टपोरी डान्स वेधतोय सर्वांचं लक्ष
बापरे! सुकेश गुन्ह्यात अडकलाय, हे माहित असूनही जॅकलिनने त्याच्याशी तोडले नव्हते संबंध; स्वप्नातील…
अमिताभ बच्चन यांचा जुहूमधील ‘त्या’ बंगल्याविषयी मोठा खुलासा, एकाच क्लिकवर घ्या जाणून