Tuesday, January 14, 2025
Home बॉलीवूड ‘आज रात्री मी एकटी नाहीये…’, म्हणत क्रितीने शेअर केला बेडरूम व्हिडिओ; सर्वत्र रंगलीय चर्चा

‘आज रात्री मी एकटी नाहीये…’, म्हणत क्रितीने शेअर केला बेडरूम व्हिडिओ; सर्वत्र रंगलीय चर्चा

मंगळवारी (दि. 30 ऑगस्ट) फिल्मफेअर पुरस्कार 2022चे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान एकापेक्षा एक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. अनेक पुरस्कारांना त्यांच्या अस्सल अभिनयासाठी सन्मानित करण्यात आले. यामध्ये कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयात खास स्थान मिळवणारी अभिनेत्री क्रिती सेनन हिचाही समावेश होता. क्रितीने सर्वोत्तम अभिनेत्रीच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. तिला तिच्या ‘मिमी’ या सिनेमासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. यानंतर तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने सांगितले आहे की, ती रात्री एकटी नाहीये.

खरं तर, अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिच्या बेडरूममधील आहे. या व्हिडिओत क्रितीसोबत तिच्या बेडवर फिल्मफेअरमधील ट्रॉफी दिसत आहे. म्हणजेच ही ट्रॉफी मिळाल्याने क्रिती इतकी खुश झालीये की, ती ट्रॉफीला जवळ घेऊन झोपली आहे. या व्हिडिओसोबत क्रितीने एक खास कॅप्शनही लिहिले आहे. त्यात ती म्हणते की, “आज रात्री मी एकटी झोपणार नाहीये. मन भरले आहे. ब्लॅक महिला शेवटी आली आहे. धन्यवाद फिल्मफेअर. या पुरस्कारासाठी आणि माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी.”

यानंतर क्रितीने पुढे लिहिले की, “सर्वात मोठा धन्यवाद डिनो आणि लक्ष्मण सरांना, ज्यांनी हा सुंदर रोल मला दिला आणि मला नेहमी पाठिंबा दिला. तुम्हा दोघांना खूप जास्त प्रेम. संपूर्ण कास्ट आणि क्रू, ज्यांनी या सिनेमाला खास बनवले. प्रिय प्रेक्षक आणि माझे चाहते, ज्यांनी मिमी आणि मला इतके प्रेम दिले. आई- बाबा आणि नुपूर… मी करून दाखवलं. पुढील अनेक मोठ्या स्वप्नांसाठी तयार.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

क्रितीचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. तसेच, तिच्या या व्हिडिओला चाहत्यांची पसंतीही मिळत आहे. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांसोबतच कलाकारांनीही कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये रणवीर सिंग आणि अभिषेक बच्चन यांचाही समावेश आहे.

इसके आगे कृति सेनन ने लिखा, ‘सबसे बड़ा थैंक्यू डिनो और लक्ष्मण सर के लिए, जिन्होंने ये खूबसूरत रोल मुझे दिया और मेरा हमेशा सपोर्ट किया। आप दोनों को बहुत सारा प्यार। पूरी कास्ट और क्रू, जिन्होंने इस फिल्म को स्पेशल बनाया। प्यारी ऑडियंस और मेरे फैंस, जिन्होंने मिमी और मुझे इतना सारा प्यार दिया। मम्मी, पापा और नुपुर…मैंने कर दिखाया। आगे और बड़े सपनों के लिए तैयार।’ कृति सेनन का यह वीडियो सोशल मीडिया पर खूब पसंद किया जा रहा है। इस वीडियो पर कमेंट करते हुए रणबीर सिंह और अभिषेक बच्चन जैसे कलाकारों ने कृति को बधाई दी है।

वर्क फ्रंट की बात करें तो कृति सेनन के पास कई सारी फिल्में लाइन में लगी हुई हैं। अभिनेत्री ‘भेड़िया’, ‘गणपत’, ‘आदिपुरुष’ और ‘शहजादा’ में दिखाई देंगी। ‘आदिपुरुष’ में कृति प्रभास के साथ स्क्रीन शेयर करेंगी। वहीं, ‘शहजादा’ में वह कार्तिक आर्यन के साथ नजर आएंगी।

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रणवीरचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाला, ‘कॅटरिना आणि दीपिका औकातीच्या बाहेरच्या’
‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉपची जबाबदारी घेणार, आमिर खानने नाकारले मानधनाचे इतके कोटी
सलमान खानसोबत ‘ही’ अभिनेत्री होस्ट करणार बिग बॉस 16? नाव ऐकून तुम्हीही व्हाल चकित

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा