बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखली जाते. तिने बॉलिवूड जगताला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहे. तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. माधुरी सध्या तिच्या आगामी ‘द फेम गेम’ या सीरिजमुळे चर्चेत आहे. अलीकडेच चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने माधुरी टीव्हीच्या प्रसिद्ध शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचली होती. यावेळी तिच्यासोबत ‘द फेम गेम’ची स्टारकास्टही उपस्थित होती. शोमध्ये, अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक मजेदार कथा कथन केल्या. त्यापैकी एक म्हणजे जेव्हा अभिनेत्रीला स्वतःचा चित्रपट पाहण्यासाठी बुरखा घालावा लागला.
खरं तर, चर्चेत कपिलने सांगितले की, ‘हम आपके है कौन’ प्रदर्शित झाल्यानंतर एक वर्षानंतर जेव्हा तो अमृतसरच्या एका चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. तेव्हा जेव्हा गाणी येत होती, तेव्हा चित्रपटगृहात बराच धुमाकूळ पाहायला मिळाला. कपिलचे ऐकल्यानंतर माधुरीलाही तिची कहाणी आठवते आणि अभिनेत्री सांगते की, काही वर्षांपूर्वी ती बुरखा घालून तिचा एक चित्रपट पाहायला गेली होती. मात्र चित्रपटातील गाणे येताच प्रेक्षकांनी नाणी फेकण्यास सुरुवात केली, त्यामुळे त्यांना पळ काढावा लागला. ही कथा माधुरीच्या (Madhuri Dixit) ‘तेजाब’ या हिट चित्रपटाशी संबंधित होती. या चित्रपटात माधुरीला स्टार बनवण्यात आले.
https://www.instagram.com/p/CaCUCWcqRTF/?utm_source=ig_embed&ig_rid=147e6e3b-732a-478c-ad0c-46245fd152a6
अभिनेत्रीने सांगितले की, ‘तेजाब’मधील ‘एक दो तीन’ गाण्यासाठी सर्वजण तिची खूप प्रशंसा करत होते. तिला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया लाईव्ह बघायच्या होत्या, म्हणून बुरखा घालून ती सिनेमाला गेली. ती गाण्याची वाट पाहत होती की, गाणे येताच प्रेक्षकांनी उत्साहात नाणी फेकायला सुरुवात केली जी अभिनेत्रीच्या डोक्याला लागली. हा प्रकार पाहून अभिनेत्री तात्काळ चित्रपटगृहाच्या बाहेर पळाली आणि यादरम्यान तिचा बुरखाही उघडला आणि प्रेक्षकांनी तिला ओळखले. मात्र, तेथे गर्दी जमण्यापूर्वीच माधुरी तेथून पटकन निघून गेली.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर माधुरी दीक्षितने नुकताच ‘डान्स दिवाने’ शोचे परीक्षण केले आहे. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची ‘कलंक’ आणि ‘टोटल धमाल’ चित्रपटात दिसली होती.
हेही वाचा-