मुलासाठी पुन्हा एकत्र आले अरबाज आणि मलायका, बऱ्याच महिन्यांनी अरहानला पाहून झाले भावुक


बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही त्या अभिनेत्रींपैकी एक हे जी नेहमीच चर्चेत असते. मग कारण तिचा ग्लॅमरस अवतार असो किंवा तिचे वैयक्तिक आयुष्य. मलायका आणि अरबाज खान (Arbaaz Khan) भले वेगळे झाले असतील, पण त्यांचा मुलगा अरहानसाठी दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. मलायका आणि तिचा पहिला पती अरबाज पुन्हा एकदा एकत्र दिसले. अरबाजचा मुलगा अरहान परदेशातील कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. अरहान ख्रिसमसच्या सुट्टीसाठी मुंबईत परतला आहे. मुलगा अरहानला घेण्यासाठी दोघेही विमानतळावर पोहोचले होते.

अरहान मुंबईत पोहोचताच मलायका आणि अरबाज आपल्या मुलाचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले. अरहानला पाहून दोघेही भावुक झाले. सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये मलायका आणि मुलगा मिठी मारताना दिसत आहेत. अरहान या वर्षी ऑगस्टमध्ये आपल्या शिक्षणासाठी परदेशात गेला होता.

मलायका आणि अरबाज अनेकदा त्यांचा मुलगा अरहानसाठी एकत्र दिसतात. या वर्षाच्या सुरुवातीलाही दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले होते. मलायका आणि अरबाज आपल्या मुलासोबत जेवणासाठी गेले होते. यावेळी मलायका आणि तिची बहीण अमृता अरोराही त्याच्यासोबत होती.

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी १९९८ मध्ये लग्न केले होते. बॉलिवूडमधील हे एक लोकप्रिय कपल होते, पण लग्नाच्या १८ वर्षानंतर दोघेही २०१७ मध्ये एकमेकांपासून वेगळे झाले. मलायका अरोरा अर्जुन कपूरला डेट करत आहे. तर अरबाज जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनीही आपापल्या आयुष्यात प्रगती केली आहे. पण ते त्यांचा मुलगा अरहानचे पालकत्व एकत्र करत आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर मलायका अरोरा नुकतीच ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर २’मध्ये दिसली होती. याशिवाय तिने टेरेन्स लुईस आणि गीता कपूर यांच्यासोबत ‘इंडियाज बेस्ट डान्स’ या डान्स रियॅलिटी शोचे परीक्षणही केले. अरबाजने नुकताच त्याचा टॉक शो ‘पिंच २’ होस्ट केला होता. अरबाजचा भाऊ सलमान खान पिंच सीझन २ चा पहिला पाहुणा होता.

हेही वाचा-

‘सुपरस्टार’ शब्द देखील छोटा वाटावा असे स्टारडम मिळवणारे रजनीकांत अभिनयात आले तरी कसे?

लग्नाच्या वाढदिवशी अनुष्का शर्माने लिहिली खास पोस्ट; विराटही म्हणाला, ‘तू माझं आयुष्य आहेस.’

सनी लिओनीने मवाली स्टाईलमध्ये केला डान्स, चक्क लुंगी नेसून उडवली चाहत्यांची झोप


Latest Post

error: Content is protected !!