बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या जोडीचं नाव बॉलिवूडच्या सर्वात गोड जोडप्यांच्या यादीत होतं. मात्र, अरबाजपासून वेगळे झाल्यानंतर मलायकाचं नाव बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसोबत जोडल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. माध्यमांतील वृत्तानुसार, हे जोडपं एकमेकांना मागील काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. जेव्हा मलायका बॉलिवूडच्या खान कुटुंबाचा भाग होती, तेव्हा अर्जुन कपूरचेही सलमान खानसोबत चांगले नाते होते. (Actress Malaika Arora Arjun Kapoor Started Acting Like A Fan Came Out Throwback Video An)
माध्यमातील वृत्तानुसार, अर्जुननेही एकेकाळी सलमानची बहीण अर्पिताला डेट केले होते. जेव्हा मलायका आणि अर्जुन एकत्र आले, तेव्हापासून अर्जुन आणि सलमानच्या नात्यात दुरावा आला. आता मलायकाचा एक जुना व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. ज्यामध्ये अर्जुन एखाद्या चाहत्याप्रमाणे वर्तणूक करताना दिसत आहे.
व्हिडिओत अर्जुन विचित्र रिऍक्शन देताना दिसत आहे. अर्जुन- मलायकाच्या चाहत्यांना त्यांचा हा व्हिडिओ भलताच आवडला आहे. खरं तर हा व्हिडिओ एका इव्हेंटचा आहे. ज्यामध्ये मलायका पोझ देताना दिसत आहे. व्हिडिओत अर्जुन मलायकाच्या पाठीमागून जाताना दिसत आहे. त्यावेळी अर्जुन मोठा स्टार नव्हता आणि मलायकाचे त्याच्यासोबत नात्यात असल्याचे कोणतेही वृत्त नव्हते. त्यावेळी मलायका अरबाजची पत्नी होती. व्हिडिओत अर्जुन एखाद्या चाहत्याप्रमाणे रिऍक्शन देताना दिसत आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, मलायकाने लग्नाच्या १९ वर्षांनंतर सन २०१७ मध्ये अरबाज खानपासून घटस्फोट घेतला होता. सध्या अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. मलायका अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये खुश आहे. असे असले, तरीही या जोडप्याला त्यांच्या वयातील फरकामुळे नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अर्जुन हा मलायकापेक्षा ११ वर्षांनी लहान आहे.
एका मुलाखतीत मलायकाने समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ती म्हणाली होती की, “जेव्हा एक मोठ्या वयाचा व्यक्ती आपल्यापेक्षा छोट्या मुलीसोबत रिलेशनशीपमध्ये असतो, तेव्हा लोक त्याची प्रशंसा करतात. मात्र, जेव्हा एखादी मोठ्या वयाची मुलगी आपल्या पेक्षा कमी वयाच्या मुलाला डेट करते, तेव्हा ती चुकीची होते.”
अर्जुन कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो नुकताच ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटात झळकला होता. यामध्ये त्याच्यासोबत परिणीती चोप्राही दिसली होती. आता तो ‘एक व्हिलन २’ आणि ‘भूत पुलिस’ चित्रपटात झळकणार आहे.
याव्यितिरिक्त मलायकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने अनेक रियॅलिटी शोमध्ये परीक्षकाचे काम केले आहे. नुकतेच ती ‘सुपर डान्सर ४’ मध्ये परीक्षण करताना दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘किंग खान’च्या लाडकीने केला जिममधील मिरर सेल्फी शेअर; दिसतेय एकदम ‘फिट एँड फाईन!’
-रशियाच्या रस्त्यांवर साडी नेसून फिरतेय तापसी पन्नू; सोशल मीडियावर रंगलीये चांगलीच चर्चा