Tuesday, June 25, 2024

‘इतकी गरिबी आली आहे का?’, मलायकाने घातले ‘असे’ कपडे की, नेटकऱ्यांकडून होतोय प्रश्नांचा भडीमार

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते. वयाच्या ४८ व्या वर्षीही ती स्वत:ला खूप तंदुरुस्त ठेवते आणि नियमितपणे तिच्या योगा आणि जिम क्लासला जाते. त्याचबरोबर ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांबरोबर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतीच मलायका पुन्हा एकदा तिच्या आउटफिटमुळे ट्रोल झाली आहे. सोशल मीडिया युजर्स तिला तिच्या शॉर्ट्स आऊटफिटमुळे ट्रोल करत आहेत. खरं तर, मलायका अरोरा पहिल्यांदाच तिच्या आऊटफिटसाठी ट्रोल होत नाहीये, याआधीही तिला अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे.

कपड्यांमुळे झाली ट्रोल
मलायका सोशल मीडियावर खूप सक्रिय असून ती चाहत्यांसाठी दररोज काहीतरी शेअर करत असते. पॅपराजी तिचे बोल्ड फोटो फॅन पेजवर शेअर करत असतात. अलीकडेच मलायका अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये रस्त्यावर दिसली होती, ज्यानंतर तिचे फोटो प्रचंड शेअर केले जात आहेत. या फोटोंमुळे ती ट्रोलही होत आहे.

मलायका दिसली शॉर्ट्स आणि टॉपमध्ये
खरं तर, या फोटोंमध्ये मलायकाने खूपच छोटे कपडे परिधान केलेले दिसत आहेत. तिने अतिशय लहान शॉर्ट आणि क्रॉप टॉप घातला आहे. या आऊटफिटमध्ये ती तिच्या योगा क्लासच्या बाहेर दिसली. आता तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत आणि असे कपडे परिधान केल्याबद्दल चाहते तिला प्रचंड ट्रोल करत आहेत.

युजर्सने मलायका अरोराची घेतली शाळा
मलायकाला ट्रोल करत एका युजरने कमेंट केली की, “तिने हे का घातले आहे?” त्याचवेळी दुसऱ्या युजरने कमेंट केली की, “इतकी गरिबी आली आहे का?” या फोटोंमध्ये मलायका स्लीपर घातलेली दिसत आहे. कोणी तिला असे छोटे कपडे घालून बाहेर येण्याचे कारण विचारले, तर कोणी विनोदात लिहिले की, या सेलिब्रिटींना थंडी वाजत नाही का, असे विचित्र प्रश्न विचारले आहेत.

मलायका मोठ्या पडद्यापासून दूर असली, तरीही ती टीव्ही शोचे परीक्षण करताना दिसते. ती सध्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर्स’ या शोचे परीक्षण करत आहे. यामध्ये तिच्यासोबत टेरेन्स लुईस, नोरा फतेही आणि गीता कपूर यांचाही समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-असे काय झाले की, तुटले शाहरुख खानच्या मुलीचे हृदय? सुहानाने शेअर केलेला फोटो चर्चेत

-ऐकावे ते नवलंच! ब्रेकअपचे दुःख विसरण्यासाठी ‘या’ हॉलिवूड अभिनेत्याने केला प्रमाणापेक्षा अधिक सेक्स

-लंडनमध्ये भर रस्त्यात टायगर श्रॉफ दिसला ‘या’ व्यक्तीबरोबर फ्लर्ट करताना, व्हिडिओ झालाय व्हायरल

हे देखील वाचा