Monday, June 24, 2024

अरेरे! मलायका अरोरा ऊप्स मोमेंटची शिकार होता होता वाचली, मोठ्या शिताफीने हाताळला ड्रेस

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते. वयाच्या या टप्प्यावरही ती स्वत:ला खूप तंदुरुस्त ठेवते आणि नियमितपणे तिच्या योगा, जिमच्या क्लासला जाते. त्याचबरोबर ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांबरोबर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मलायकाने इंडस्ट्रीत खूप नाव कमावले आहे. तसेच, जिम लूकपासून रेड कार्पेट लूकपर्यंत मलायकाचे खूप कौतुक केले जाते. पण कधी कधी मलायका चाहत्यांकडून ट्रोल देखील होते. अलिकडेच मलायका तिच्या ड्रेसमुळे ट्रोल झाली आहे.

मलायका मिस डिवा युनिव्हर्स ग्रँड फिनालेमध्ये अतिशय स्टायलिश स्टाईलमध्ये पोहोचली होती. पिवळ्या फुलांच्या गाऊनमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत होती. तिने हिऱ्याचे कानातले, हिऱ्याची अंगठी घातली होती. गोल्डन हील्स घातलेली सुंदर मलायका जेव्हा कॅमेऱ्यासमोर फोटोसाठी पोझ देण्यासाठी आली तेव्हा तिचा फ्लोरल गाऊन थोडासा घसरला. त्यामुळे ती वॉर्डरोब मॉलफंक्शन होण्यापासून थोडक्यात वाचली.

खरंतर, मलायकाचा ड्रेस तिच्या हातावर खाली घासरत होता. पण मलायकाने वेळेत स्वतःला सांभाळले आणि लगेच परत कॅमेऱ्यासमोर पोझ द्यायला सुरुवात केली. मात्र तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

मलायका पहिल्यांदाच तिच्या आउटफिटसाठी ट्रोल होत नाहीये, याआधीही तिला अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. फॅशन डिझायनर जोडी फाल्गुनीच्या काला घोडा स्टोअर लॉन्चमध्ये मलायका अतिशय सुंदर निळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून आली होती. परंतु कॅमेऱ्यासमोर येताच तिचा डीप नेक टॉप खराब झाला होता. त्यानंतर तिने तो दुरुस्त करण्यास सुरुवात केली आणि हे सर्व फोटोंमध्ये कैद झाले.

छोटे कपड्यांमुळे झाली होती ट्रोल

अलिकडेच मलायका खूप छोटे कपडे परिधान करून रस्त्यावर दिसली होती. त्यावेळी चे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळी तिला अनेक युजर्सनी ट्रोल देखील केले होते. ट्रोल करत एका युजरने लिहिले की, “तिने हे का घातले आहे?” त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, “इतकी गरिबी आली आहे का?” या फोटोंमध्ये मलायका स्लीपर घातलेली दिसत आहे. कोणी तिला असे छोटे कपडे घालून बाहेर येण्याचे कारण विचारले, तर कोणी विनोदात लिहिले की, या सेलिब्रिटींना थंडी वाजत नाही का.” सध्या मलायका टीव्हीवर एका डान्स रियॅलिटी शोचे परीक्षण करताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा