Monday, March 4, 2024

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री गळफास घेत संपवलं आयुष्य, कंगना रणौतसोबत केले होते काम

प्रसिद्धा गायिका आणि अभिनेत्री मल्लिका राजपूत हिनं गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. त्यामुळे सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. सुलतानपूर येथील घरी तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याने अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. पोलिसांनी मल्लिकाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरु झाला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी येत तपासणी केली. तसंच शवविच्छेदनासाठी मल्लिकाचं पार्थिव पाठवलं आहे. या घटनेमुळं अनेकांना धक्का बसला आहे. मल्लिका राजपूतच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ‘नेहमीप्रमाणे रात्री खोलीत गेली आणि दरवाजा आतून बंद केला. सकाळी तिने दरवाजा न उघडल्याने घरातील सदस्यांनी कसा तरी दरवाजा उघडला. त्यावेळी मल्लिका पंख्याला लटकलेली दिसली. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

मल्लिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, मल्लिका राजपूत उत्तर प्रदेशातील सुल्तानपूरची रहिवासी आहे. अभिनेत्री कंगना राणौतसोबत स्क्रीन शेअर केली होती. कंगनासोबत ती ‘रिव्हॉल्वर रानी’ या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसली होती. याशिवाय प्रसिद्ध गायक शानच्या ‘यारा तुझे’ या म्युझिक अल्बममधून मल्लिकाला प्रसिद्धी मिळाली होती. तसंच मल्लिकाने अनेक अल्बम आणि मालिकांमध्येही काम केलं होतं. मल्लिका राजपूतने जावेद अलीसाठी 2013 मध्ये सव्वा तासाचं गाणं ‘तेरी आखिर’ लिहिलं होतं. त्यासाठी तिचं नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदलं गेलं. मल्लिकाने 6 हजारपेक्षा जास्त गझल लिहिल्या आहेत.

तसेच, मल्लिकाचा हंसराज हंससोबत ‘एक इशारा’ हा अल्बमही रिलीज झाला होता. मल्लिका 2014 च्या लोकसभा निवडणुकीत, अभिनेता रवी किशनसाठी काँग्रेसचा प्रचारार्थ उतरली होती. मात्र प्रामाणिक पक्षाची गरज आहे म्हणत तिने भाजपमध्ये प्रवेश केला होता. मल्लिकाने 26 ऑगस्ट 2016 रोजी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं होतं. मात्र आता तिने भाजपला रामराम ठोकला.
यासोबतच मल्लिका राजपूतने भय्यू महाराज यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. त्यावेळी ती चांगलीच चर्चेत आली होती. भय्यू महाराज हे अत्यंत भोंदू महाराज असून, त्यांनी फसवणूक केल्याचा दावा करणारी पोस्ट मल्लिकाने राजपूतने लिहिली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

रुह बाबा करणार दोन भुतांचा सामना, विद्या बालनसोबत माधुरी दीक्षितची \भूल भुलैया 3′ मध्ये वर्णी
अक्षयच्या नव्या चित्रपटाची घोषणा, खिलाडी कुमार दिसणार ‘सरफिरा’ स्टाईलमध्ये, रिलीजची तारीख जाहीर

हे देखील वाचा