Monday, February 26, 2024

अक्षयच्या नव्या चित्रपटाची घोषणा, खिलाडी कुमार दिसणार ‘सरफिरा’ स्टाईलमध्ये, रिलीजची तारीख जाहीर

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार (Akshay kumar) हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. त्याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतायंत. अक्षय कुमार हा बी टाऊनचा असा एकमेव अभिनेता आहे ज्याचे एका वर्षाला तब्बल चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात.

अक्षयचा ‘बड़े मियां छोटे मियां’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. अशातच त्याने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या नव्या चित्रपटात अक्षय साऊथ सुर्याच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. इतकेच नव्हे तर त्याने रिलिज डेटही जाहिर केली आहे.

साऊथचा प्रसिद्ध अभिनेता सूर्याच्या सोरारई पोटरु नावाच्या चित्रपटाचा हिंदी रिमेक अक्षय कुमार करत आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. टीझर शेअर करत अक्षयने आपल्या चाहत्यांना नव्या चित्रपटाची माहिती दिली आहे. या नव्या चित्रपटाचे नाव ‘सरफिरा’ असे आहे. या टीझरमध्ये अक्षय मनसोक्त हात सोडून बुलेट चालवण्याचा आनंद घेताना दिसत आहे. त्याने ‘इतकी मोठी स्वप्न पाहा की लोक तुम्हाला वेडे म्हटले पाहजे’ अशी कॅप्शन देत आपल्या इस्टावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तो बाईक चालवताना दिसतो आहे. १२ जुलै २०२४ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘सोरारई पोटरु’ या चित्रपटात साऊथ स्टार सूर्या, अपर्णा बारामुरली, परेश रावल प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला. सुर्याच्या कामाचं खुप कौतुक करण्यात आलं. हिंदी रिमेकमध्ये सुर्याने साकारलेली भूमिका अक्षय कुमार करणार असून त्याच्यासोबत राधिका मदान, परेश रावल हे कलाकार झळकणार आहेत.

अक्षय कुमारचा आगामी काळात बडे मिया छोटे मिया नावाचा चित्रपट येणार आहे. त्यात तो पहिल्यांदा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफसोबत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘रिल्सस्टार’साठी खुशखबर ! सरकारकडून नॅशनल क्रियेटर्स अवॉर्डने होणार सन्मान, या ठिकाणी करा रजिस्ट्रेशन
सोळावं वरीस अन् १० मिलियन फॉलोअर्स; आमिर खानला सोशल मीडियावर अशी सापडली नवी अभिनेत्री

हे देखील वाचा