Saturday, July 6, 2024

कौतुकास्पद! मराठमोळ्या मानसी नाईकने लहान मुलांसाठी उचललं ‘हे’ पाऊल, पाहून तुम्हीही कराल कौतुक

अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) हिचा समावेश मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत होतो. अभिनयासोबत तिने डान्सची कला देखील जोपासली आहे. तिच्या डान्सची झलक आपण सर्वांनी पाहिलीच आहे. तिने मराठीमध्ये अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. मानसी आजकाल सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे डान्स व्हिडिओ तसेच फोटो देखील ती वारंवार सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच मानसीने तिचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मानसी नाईकने नुकतेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, खूप लहान मुले आहेत. जी रांगेत उभी राहून हातात जेवणाच ताट पुढे जात आहेत. तर अनेकजन हात जोडून उभा राहिलेले दिसत आहेत. त्याचवेळी अभिनेत्री मानसी नाईक त्या सर्व मुलांना जेवण वाढताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मानसी नाईक प्रचंड सुंदर दिसत आहे. त्यासह ती मुलांना जेवण वाढताना खूप आनंदी दिसत आहे.

या व्हिडिओमधून दिसून येत आहे की, अभिनेत्री मानसी नाईकला हे काम  करण्यात किती आनंद मिळत आहे. यात अभिनेत्रीचा उत्साह पाहण्यासारखा आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओला चाहते प्रचंड प्रेम प्रतिसाद देत आहेत. सतत या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव करत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘जिंदगी प्यार का गीत हैं’ वाजत आहे. जे लता मंगेशकर यांनी गायले आहे.

मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा