Tuesday, July 9, 2024

शुभमंगल सावधान!! मौनी रॉय ‘या’ व्यावसायिकासोबत अडकणार लग्नबंधनात?

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टाईलने आणि लूकने प्रेक्षकांना आपलंसं करण्याची एकही संधी सोडत नाही. तिच्या नवीन स्टाईलमुळे ती सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंड होत असते. तिच्या डान्सवर तर सगळे फिदा होत असतात. ती सध्या तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामूळे देखील खूपच चर्चेत असते. मागील काही दिवसांपासून ती तिच्या लग्नामुळे खूपच चर्चेत आहे.

मौनी रॉय ही सूरज नांबियार सोबत लग्न करणार असल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे. तिने नुकतेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून सूरजसोबतचे काही फोटो शेअर केले होते. तिथे त्यांच्यासोबत संपूर्ण कुटुंब दिसत आहे. एवढच नाही, तर तिने हे फोटो शेअर करत सूरजच्या आई-वडिलांना ‘मॉम डॅड’ असे म्हटले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सूरज आणि मौनीने काही दिवसांपूर्वीच आपले नाते घरच्यांसोबत शेअर केले आहे . त्यानंतर त्या दोघांचेही आई-वडील एकमेकांना भेटले होते. त्यांची ही बैठक मंदिरा बेदीच्या घरी झाली होती. यावेळी मौनीचा भाऊ देखील उपस्थित होता. मौनी आणि मंदिरा बेदी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.

त्या दोघांच्या नात्याची चर्चा खूप दिवसांपासून चालू होती. मौनीने सूरजच्या आई- वडिलांसोबत दुबईमध्ये नवीन वर्षाचे स्वागत देखील केले होते. जेव्हा संपूर्ण देशात लॉकडाऊन होते, तेव्हा मौनी तिच्या संपूर्ण परिवारासोबत दुबईमध्ये होती. त्यावेळी त्यांच्या लग्नाबाबत कोणताही विषय नव्हता. याआधी ती मोहित रैनासोबत रिलेशनमध्ये होती. त्यांच्या नात्याची चर्चा देखील सर्वत्र झाली होती. पण आता त्यांचे ब्रेकअप होऊन बरेच दिवस झाले आहेत.

मौनीने आपल्या करिअरची सुरुवात एकता कपूरच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेतून केली होती. तिने ‘देवों के देव महादेव’ यात देखील काम केले आहे. तिला ‘नागिन’ या मालिकेने देखील खूप लोकप्रियता दिली. तिने अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तसेच ती लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ कारणामुळे गौहर खानवर घातला दोन महिन्यांसाठी बहिष्कार; तर निर्मात्यांनाही मिळालाय कडक इशारा

-अक्षरा सिंगने मारला डोळ्यांचा बाण, तर चाहत्यांच्या हृदयावर झाला जोरदार वार!

-अभिनेत्रीने शेअर केला बोल्ड डान्स व्हिडिओ; ‘या’ भितीपोटी बंद केला कमेंटचा पर्याय

हे देखील वाचा