Sunday, May 19, 2024

प्रतीक्षा संपली! आलियाने आई झाल्यानंतर शेअर केला पहिला फाेटाे; चाहते म्हणाले, ‘बाळाचा फाेटाे…’

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट हिने नुकतेच एका मुलीला जन्म दिला आहे. आलिया सध्या मॅटर्निटी डे एन्जॉय करत आहे. आलियाच्या मुलीचा जन्म झाल्यापासून तिचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर होते. अशा परिस्थितीत जेव्हा आलियाने आई झाल्यानंतर पहिल्यांदाच तिचा फोटो शेअर केला तेव्हा निराश झालेल्या चाहत्यांनी बाळाचा चेहरा दाखवण्याची मागणी केली.

अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या दोघांची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. आलिया-रणबीरने अद्याप आपल्या मुलीची चाहत्यांना ओळख करून दिली नाही. अशात आलियाने मंगळवारी (16 नाेव्हेंबर)ला सकाळी इंस्टाग्रामवर पहिला फोटो शेअर केला, जो पाहून टायगर श्रॉफ, मनीष मल्होत्रा, झोया अख्तरही प्रेमात पडले.

आलिया भट्टने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे (alia bhatt shares first pic), ज्यामध्ये तिच्या हातात कॉफीचा मग आहे. या फोटोमध्ये आलिया देखील स्पष्ट दिसत नसली तरी जी इमेज समोर येत आहे, त्यावरून ती आलियाच आहे, असा अंदाज बांधणे अवघड नाही. केशरी रंगाच्या कपावर पांढऱ्या रंगात ‘मामा’ असे लिहिले आहे. आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘हा मी आहे’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

आलिया भट्टचा हा फोटो पाहून चाहते आणि सेलिब्रिटी प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि आलियाची छोटी परी पाहण्याची मागणीही करत आहेत. टायगर श्रॉफने याला ‘क्यूट’ म्हटले तर, मनीष मल्होत्रा ​​आणि झोया अख्तर यांनी हार्ट इमोजी शेअर करून आपले प्रेम व्यक्त केले. अनेक चाहते ‘लव्हली मम्मा’, ‘स्वीटेस्ट मम्मा’ असे लिहून कौतुक करत आहे. अशात एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “कृपया बाळाचा फोटो दाखवा, आम्हाला बघायचे आहे.”

आलिया भट्टने 6 नोव्हेंबरला एका मुलीला जन्म दिला. मात्र, आलिया आणि रणबीर कपूर यांनी अद्याप आपल्या मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. (bollywood actress alia bhatt shares first pic after became mom fans says please show us baby pic)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रेयसीचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबवर स्वराचा राग आला उफाळून; ट्विट करत म्हणाली…

‘आक्कल दाढ काढली म्हणून आक्कल पण…;’म्हणत, धनश्री काडगावकरने शेअर केला व्हिडिओ

हे देखील वाचा