Sunday, May 19, 2024

‘तारक मेहता’च्या सेटवर अभिनेत्याला मारहाण? अभिनेत्रीचा गंभीर आरोप, लगेच वाचा

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध मालिकेचे कलाकार आणि निर्माते सध्या मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल यांनी निर्माते असित कुमार मोदी, सोहेल रमाणी आणि जतिन बजाज यांच्यामार्फत सेटवर झालेल्या गैरवर्तनाबद्दल खळबळजनक खुलासा केला, तेव्हापासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

त्यानंतर आता या मालिकेत बावरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मोनिका भदोरिया यांनीही निर्मात्यांवर गंभीर आरोप केलेत. त्यामुळे मालिकेमुळे निर्माण होणाऱ्या वादाचे सत्र काही संपताना दिसत नाहीये. मालिकेच्या सेटवर एका अभिनेत्याला मारहाण झाल्याचा धक्कादायक खुलासा अभिनेत्री मोनिका भदोरियाने केलाय. नुकत्याच एका मुलाखतीत तीने हा खुलासा केला.

अभिनेत्री मोनिका भदोरिया हिने ‘बॉलीवूड बबल’ या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मालिकेच्या सेटवर सर्व कलाकारांना सोहेल रमानीने सर्वाधिक त्रास दिला आहे. त्याने एकदा सेटवरच्या खुर्च्या सुद्धा फेकून दिल्या होत्या, तो सर्वांशी उद्धटपणे वागतो आणि बहुतांश कलाकारांशी त्याचे भांडण झाले आहे. एवढी भांडणे होऊनही सोहेल अजून प्रोडक्शन हेड आहे. याउलट सर्व कलाकार शो सोडून जात आहेत. एकदा एक अभिनेता मी त्याचे नाव घेणार नाही, तो आपल्या आईला औषध देण्यासाठी गेला होता, म्हणून त्याला सेटवर यायला उशीर झाला. तेव्हा सोहेलने आरडाओरडा सुरु केला, तो अतिशय घाणेरडा व्यक्ती आहे. पुढे हे भांडण मारहाण करण्यापर्यंत पोहोचले होते,” असा धक्कादायक खुलासा मोनिकाने मुलाखतीत केला.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या लोकप्रियतेवर या आरोपांचा नक्कीच परिणाम होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

अधिक वाचा –
– इंजिनिअर ‘टी. गोपीचंद’ने खलनायक म्हणून केली एन्ट्री, आज आहे साऊथचा ‘सुपरस्टार’ । Happy Birthday T. Gopichand
– मोठी बातमी! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या कारचा भीषण अपघात, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा