तेलुगू सिनेसृष्टीतील ऍक्शन स्टार म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार म्हणजे अभिनेता टी गोपीचंद होय. त्याने अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. गोपीचंदने 2001मध्ये आलेल्या ‘थोली वलापू’ या चित्रपटातून खलनायक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘थोली वलापू’ चित्रपट त्या काळात हिट झाला होता. त्यावेळी गोपीचंदही रातोरात स्टार बनला. मग काय तो इंडस्ट्रीत प्रचंड प्रसिद्ध झाला.
सलग 3 चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर 2004मध्ये त्याने ‘यगनम’ या चित्रपटातून नायक म्हणून काम करण्यास सुरूवात केला. गोपीचंद (Gopichand) तापसी पन्नूच्या ब्लॉकबस्टर चित्रपट सहसाममध्ये देखील मुख्य भूमिकेत दिसला होते. 2007मध्ये रिलीज झालेल्या ‘ओक्कादुन्नाडू’ या चित्रपटात त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. एका गुंडाची कथा या चित्रपटात दाखण्यात आली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
गोपीचंद आणि रकुलप्रीत सिंग यांचा उत्कृष्ट चित्रपट ‘लोकयम’ची प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. लोकयम 2014साली प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट आजही अनेकदा टीव्हीवर दाखवला जातो. गोपीचंदचा ‘गोलीमार’ हा एक दमदार चित्रपट आहे, जो प्रेक्षक आजही टिव्हीवर आवडीने पाहतात. या चित्रपटाची कथा एका अशा माणसावर आधारित आहे, ज्याला पोलिस दलात भरती व्हायचे आहे. त्यासाठी तो सतत धडपडत असतो. पोलिसात भरती झाल्यावर तो एन्काउंटर स्पेशालिस्ट बनतो. 2015 साली प्रदर्शित झालेला ‘जिल’ हा एक अतिशय खास चित्रपट होता, ज्यामध्ये प्रेक्षकांना गोपीचंदची अतिशय दमदार शैली पाहायला मिळाली.
गोपीचंदचा जन्म 12 जून1979 साली झाला आहे. त्याचे वडील चित्रपट निर्माते टी कृष्णा हे होते. गोपीचंद 8 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. गोपीचंदने चेन्नई येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी रशियाला गेले होता. रशियात त्याने इंजीनियरिंगची पदवी घेतली. गोपीचंदचा मोठा भाऊ प्रेमचंद सहाय्यक दिग्दर्शक होता, पण गोपीचंद रशियात असताना त्याच्या भावाचा अपघातात मृत्यू झाला. त्याला एक धाकटी बहीण आहे. (Most Popular Movies of Famous Actor Gopichand)
अधिक वाचा-
–“ड्रग्जच्या व्यसनाधीनतेसाठी ओळखला जाणारा अभिनेता श्रीरामाच्या भुमिकेत…”, कंगना खवळली, वाचा बातमी
–‘आदिपुरुष’ पाहताना ‘हनुमानजींच्या’ सीट शेजारी बसण्यासाठी खिसा करावा लागणार रिकामा? निर्माते म्हणाले, ‘आम्ही…’