मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अनेक टीव्ही मालिका, रिएलिटी शो आणि चित्रपटातून झळकलेली मराठी अभिनेत्री मीरा जोशी हिचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गवार अपघात झालाय. या संदर्भात अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. ( Marathi Actress Meera Joshi Car Accident On Mumbai Pune Express Way Video )
सदर अपघातात अभिनेत्रीला फारशी इजा झालेली नसली तरीही तिच्या कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अभिनेत्री मिरा जोशी हिची गाडी दुभाजकावर धडकली आणि त्यामुळे कारचे नुकसान झाले. मिराने गाडीचे फोटो आणि एक व्हिडिओ इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे.
View this post on Instagram
या पोस्टमध्ये मिरा म्हणते की, “प्रिय सखी.. किती आणि कुठे कुठे भटकलो ना गं आपण.. रात्र, दिवस, ऊन, वारा, पाऊस, चढ, उतार काहीही असो.. आपण दोघींनीही एकमेकींची काळजी घेतली. पण आज.. आज इतका भयंकर अपघात होऊनही तू स्वतःला संपवणं पत्करलं पण मला किरकोळ ओरखडाही येऊ दिला नाहीस तू.. थँक यू.. थँक यू व्हेरी मच.. प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच. तब्बल 90 हजार मैलांचा आपला प्रवास.. आता विश्रांती घे.. लव्ह यू..” अशी पोस्ट तिने केली आहे.
अधिक वाचा –
– ‘आदिपुरुष’ पाहताना ‘हनुमानजींच्या’ सीट शेजारी बसण्यासाठी खिसा करावा लागणार रिकामा? निर्माते म्हणाले, ‘आम्ही…’
– करण जोहरच्या कुटुंबातील ‘या’ व्यक्तीने केलं होतं 5 वेळा लग्न; जाणून घ्या त्या व्यक्तीबद्दल