Tuesday, January 20, 2026
Home बॉलीवूड आलियानंतर आता मौनी देणार गुडन्यूज? लेटेस्ट फोटोतून उघडं पडलं अभिनेत्रीचं पितळ

आलियानंतर आता मौनी देणार गुडन्यूज? लेटेस्ट फोटोतून उघडं पडलं अभिनेत्रीचं पितळ

कलाविश्वात अशा खूप कमी अभिनेत्री आहेत, ज्यांनी छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या अभिनेत्रींपैकीच एक म्हणजे मौनी रॉय होय. मौनी ही दरदिवशी सोशल मीडियावर झळकताना दिसते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिला इंस्टाग्रामवर २ कोटींहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. कदाचित त्यामुळेच तिच्या प्रत्येक पोस्टला लाखो लाईक्स मिळत असतात. मात्र, ती नुकतीच तिच्या नवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

खरं तर, अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने रिव्हिलिंग ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. इतकेच नाही, तर टीव्ही अभिनेत्री रक्षंदा खान (Rakshanda Khan) हिलाही मौनीच्या प्रेग्नंसीबाबत संशय आला आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिनेदेखील लग्नाच्या दोन महिन्यांनंतर तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती.

मौनीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पिवळ्या रंगाच्या सैल ड्रेसमध्ये दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ब्लूम बेबी ब्लूम…!” तिच्या या फोटोंना आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, चाहते कमेंट करत तिच्यावर कौतुकाचा वर्षावही करत आहेत. अभिनेत्री रक्षंदा खान हिलादेखील वाटले की, मौनी खरंच प्रेग्नंट असल्याचे वाटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

तिने मौनीच्या फोटोवर कमेंट करत लिहिले की, “अरे देवा मी ते ‘बेबी ब्लूम’ असे वाचले. मला वाटते की, हे मुलीच्या लग्नाचे साईड इफेक्ट्स आहेत.” चाहत्यांनीही रक्षंदाची साथ देत कमेंट करण्यास सुरुवात केली. एका चाहतीने लिहिले की, “तुम्ही ‘बेबी ब्लूम’ लिहिले आहे. मी प्रार्थना करते की, ही बातमी खरी असावी.” तसेच दुसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिले की, “तू तर एका क्षणासाठी अटॅकच दिला होता.”

खरं तर, मौनीपूर्वी अभिनेत्री करीना कपूर आणि अंकिता लोखंडे यांनीही सैल कपडे परिधान केल्यामुळे त्यांच्या प्रेग्नंसीच्या चर्चा रंगल्या होत्या.

मौनीचे लग्न
मौनीने २७ जानेवारी, २०२२ रोजी दुबईस्थित व्यावसायिक सूरज नांबियार याच्यासोबत संसार थाटला होता. मात्र, अभिनेत्रीने तिच्या मुलाबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाहीये. तिच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर ती आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
स्वत:च्याच लग्नात ‘या’ अभिनेत्रीला ओढणी अन् नेकलेसचंही नव्हतं भान, फुल पिऊन लावलेले ठुमके
एक्स पत्नीविरुद्ध खटला जिंकल्यानंतर पुन्हा चर्चेत आला जॉनी डेप, पेंटिंग्स विक्रीतून कमावले ‘एवढे’ कोटी
सचिनच्या लेकीचा शॉपिंगचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरीही म्हणाले, ‘पैशांची कमाल बाबू भैय्या’

हे देखील वाचा