Friday, July 5, 2024

मौनी रॉयसाठी ‘ब्रह्मास्त्र’ आहे खूपच खास; ओटीटी स्ट्रीमिंगबद्दल म्हणाली…

बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय हिने आपल्या अभिनयाच्या बळावर इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यासारख्या दमदार कलाकारांसाेबत ‘ब्रह्मास्त्र‘ चित्रपटात दिसली हाेती. मौनी सध्या तिच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या डिजिटल प्रीमियरमुळे चर्चेत आहे. हा चित्रपट तिच्यासाठी कसा आणि का खास आहे याचा नुकतंच तिनं खुलासा केला आहे.

माध्यमांशी बाेलताना माैनी राॅयने व्यक्त केला अनुभव
‘ब्रह्मास्त्र’ (brahmastra) चित्रपटाबद्दल बोलताना मौनी रॉय (mouni roy) म्हणाली, “मला चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीतील काही दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने मला अविश्वसनीय अभिनेते आणि दिग्गजांसोबत काम करण्याची संधी दिली. हा अनुभव माझ्यासाठी नेहमीच खास राहील.”

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

चित्रपटामध्ये ‘या’ दिग्गज कलाकारांचा समावेश
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मला या चित्रपटातून खूप काही शिकायला मिळाले. या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करणे माझ्यासाठी सौभाग्य होते. ते ज्या शिस्तीने आणि आवडीने नियमित काम करतात त्यातून मी खूप काही शिकले. मेगास्टार अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि तेलुगू मेगास्टार नागार्जुन अक्किनेनी यांसारख्या अभिनेत्यांसोबत काम करणे हा एक वेगळा अनुभव होता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

‘ब्रह्मास्त्र’ ओटीटी प्लॅटफाॅर्मवर 4 नोव्हेंबर हाेणार प्रदर्शित
अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन निर्मित, हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

अलीकडेच माैनी राॅय हिने हॅलाेवीन लूक केला हाेता. अभिनेत्रीचा हॅलाेवीन लूक साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, ज्यावर चाहत्यांनी भरभरुन लाईक आणि कमेंट्स वर्षाव केला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
सई तम्हणकरच्या पोस्टला क्रांती रेडकरची ‘लक्षवेधी कमेंट, सोशल मीडियावर करतेय कतहर…

रूपा अंडरविअर-बनियानसाेबत टीना दत्ताची तुलना, विशाल कोटियनने साधला निशाना

हे देखील वाचा