Friday, July 12, 2024

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ‘या’ दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार ‘ब्रह्मास्त्र’

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) यांचा ब्रह्मास्त्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. दिग्दर्शक अयान मुखर्जीने 10 वर्षांपूर्वी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर या सिनेमावर काम सुरू केले होते. 10 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न अखेर बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत यशस्वी ठरला आहे. आता हा सिनेमा ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

बाॅक्स ऑफिसवर धूमाकुळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर आपली जादू करण्यास सज्ज झालाय. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा होत्या की, रणवीर आणि आलियाचा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. मात्र, नेमक्या कोणत्या तारखेला चित्रपट रिलीज होणार हे कळू शकले नव्हते. परंतू चित्रपट निर्मात्यांकडून याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आलीये.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन अक्किनेनी असे अनेक स्टार्स दिसले. ओटीटीवर प्रकाशनावर भाष्य करताना, दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाले, “ब्रह्मास्त्रला प्रत्यक्षात आणण्याचा प्रवास अतिशय रोमांचक आणि आव्हानात्मक होता आणि जगभरातील प्रेक्षकांचा मी खरोखर आभारी आहे ज्यांनी तो स्वीकारला आहे. आता पुन्हा एकदा प्रेक्षक त्यांच्यासोबत शेअर करू शकतात. त्यांचे मित्र. आणि कुटुंबांसोबत त्यांच्या घरातील आरामात ते पुन्हा पहा.

ब्रह्मास्त्र हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. हा यावर्षीचा सर्वात मोठ्या बजेटचा चित्रपट आहे. सुरूवातीला चित्रपटाचा जोरदार विरोधात करण्यात आला. मात्र, त्यानंतर चित्रपट हीट ठरला. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत हा चित्रपट आता तुम्ही ओटीटीवर पाहू शकणार आहात.

ब्रह्मास्त्र चित्रपट आपल्या मोबाईलवर आणि घर बसल्या बघण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे. कारण हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर बघता येणार आहे. कोरोनाच्या काळानंतर प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे टाळत आहेत. यामुळे ओटीटीवर चित्रपट रिलीज करण्यावर निर्मात्यांचा कल आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, 25 दिवसांत आलिया-रणबीरच्या चित्रपटाने जगभरात 425 कोटींची कमाई करून बॉक्स ऑफिसचा धमाल केली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
उर्वशीच्या गळ्यात रिषभ पंतची चेन? फाेटाे पाहून चाहतेही झाले कनफ्यूज
कंगनाने मणिकर्णिका फिल्म्सच्या टीमसोबत साजरी केली दिवाळी, एकता कपूरच्या पार्टीत देखील उपस्थित, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा