राखी सावंत बनली ‘नागिन’, पाहा प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेत्रीचा अवतार

bollywood rakhi sawant turns into sridevi shares funny video on instagram


राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणाने दररोज चर्चेत असते. बिग बॉस 14 मध्ये आपला निराळा अवतार दाखविल्यानंतर, ती पुन्हा एकदा नवीन अवतारामुळे चर्चेत आली आहे. राखीचा हा नवीन अवतार तिने कसा केला, हे पाहून तिचे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. तिचा हा अवतार प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावतोय.

बिग बॉस 14 दरम्यान राखीने तिचा ‘ज्युली’ अवतार दाखवला होता आणि अभिनव शुक्लावर प्रेमाचा दावा करून एक विचित्र प्रेमीदेखील बनली होती. आता राखी सावंतने घेतलेले रूप म्हणजे श्रीदेवीचा ‘नागिन’ अवतार.

राखी सावंतचा हा नवा लूक पाहिल्यानंतर कोणीच स्वतः च्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही. व्हिडिओमध्ये राखी ‘मैं नागिन तू सपेरा’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. तथापि, हा एक मॉर्फ्ड व्हिडिओ आहे, ज्यामध्ये राखीचा चेहरा श्रीदेवीच्या चेहऱ्यावर लावला आहे.

हा व्हिडिओ ड्रामा क्वीनच्या चाहत्यांना पोट धरून हसायला लावतोय. कारण या लूकमध्ये ती मजेदार दिसत आहे. बरेच नेटकरी या व्हिडिओवर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

काही वापरकर्ते तिला विचारत आहेत की, हे तिने कसे केले? व्हिडिओ शेअर करताना राखी सावंतने सांगितले की, श्रीदेवी ही तिची आवडती अभिनेत्री आहे आणि म्हणूनच तिने हा व्हिडिओ बनविला आहे. व्हिडिओ शेअर करत राखीने तिच्या चाहत्यांना यावर प्रतिक्रिया देण्यासही सांगितले आहे. परंतु यात तिच्याकडून एक चूकदेखील झाली आहे. कॅप्शनमध्ये राखीने चित्रपटाचे नाव लिहिले आहे. तिने ‘नगीना’ ऐवजी ‘नागिन’ असे लिहिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ग्रीक गॉड’ ऋतिक रोशनचे आलिशान घर पाहून तुम्हीही व्हाल थक्क, एकदा पाहाच

-खेसारी लालच्या ‘इश्क’ गाण्याची जादू आजही प्रेक्षकांवर कायम, मिळालेत २ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज

-बॅडमिंटन स्टार ‘सायना’च्या बायोपिकमध्ये परिणीती मुख्य भूमिकेत, ट्रेलरला मिळतंय भरभरून प्रेम


Leave A Reply

Your email address will not be published.