Tuesday, June 25, 2024

नीतू आणि ऋषी कपूर यांचा मोटरसायकलवरील ‘तो’ भन्नाट फोटो वेधतोय सर्वांचं लक्ष, तुम्हीही पाहिला का?

नीतू कपूर आणि ऋषी कपूर हे बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. चित्रपटसृष्टीतील सगळ्यात लोकप्रिय जोडप्यांचा जेव्हा उल्लेख होतो, तेव्हा हे गोड जोडपे नेहमीच सुरुवातीला असते. ऋषी कपूर यांनी २०२० साली या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर नीतू कपूर नेहमीच त्यांच्या भावना व्यक्त करत असतात. अशातच पतीच्या आठवणीत पुन्हा एकदा नीतू कपूर भावुक झाल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतच एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांचे प्रेम व्यक्त केले आहे.

नीतू कपूर या चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. त्या नेहमीच चर्चेत असतात. अशातच मंगळवारी (३० नोव्हेंबर) त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतच एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, दोघेही खूपच सुंदर दिसत आहे. ते दोघेही एका मोटारसायकलवर बसलेले आहेत. नीतू या पुढे बसल्या आहेत, तर त्यांचा मागे ऋषी कपूर बसलेले आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. (Actress neetu kapoor share a throwback photo with rushi kapoor on social media)

अनेकांना त्यांचा हा फोटो खूपच आवडला आहे. अनेक कलाकार या फोटोवर कमेंट करत आहेत. त्यांची मुलगी रिद्धीमा कपूर हिने देखील या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत. यासोबतच अनेक कलाकारांनी या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा जुना फोटो पाहून त्यांचे अनेक चाहते भावुक झाले आहेत. याआधी देखील ऋषी कपूर यांच्या वाढदिवशी नीतू कपूर आणि मुलगी रिद्धीमा कपूर यांनी त्यांचा फोटो शेअर करून त्यांना आदरांजली अर्पण केली होती.

नीतू कपूर यांनी याआधी इंस्टाग्रामवर त्यांच्या चित्रपटात संबंधित एक फोटो शेअर केला होता. त्यांनी मेकअप रूममधील एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करून त्यांनी चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असल्याची बातमी दिली आहे. या फोटोसोबत त्यांनी लिहिले होते की, “अखेर ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे. या चित्रपटात काम करण्याचा अनुभव खूप चांगला आहे. या निमित्त मला खूप चांगले मित्र मिळाले. या चित्रपटामुळे मला माझा आत्मविश्वास पुन्हा मिळण्यास खूप मदत मिळाली, ज्याची मला खूप गरज होती. हा चित्रपट माझ्यासाठी नेहमीच खास राहणार आहे.”

या चित्रपटातून नीतू जवळपास ७ वर्षानंतर चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! ‘छोरी’ फेम नुसरतसोबत घडली विचित्र घटना, ३० सेकंदात सोडावं लागलं अभिनेत्रीला हॉटेल

-गायिका शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत बांधली लगीनगाठ, मोजक्या लोकांच्या उपस्थित केले लग्न

-अरे देवा! पुन्हा पोस्टपॉन झालं आलिया अन् रणबीरचं लग्न, काय आहे नेमकं कारण?

हे देखील वाचा