Saturday, June 15, 2024

गायिका शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत बांधली लगीनगाठ, मोजक्या लोकांच्या उपस्थित केले लग्न

सध्या बॉलिवूडमध्ये कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यांचे लग्न कधी, कुठे होणार किती पाहुणे असणार याबद्दल रोजच नवनवीन बातम्या समोर येत आहेत. या २०२१ वर्षांमध्ये बॉलिवूडच्या अनेक मोठमोठ्या कलाकारांनी त्यांची लगीनगाठ बांधली. मीडियामध्ये हि सर्वच लग्न तुफान गाजली. मात्र यासर्वांमधे एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या आवाजाने सर्वांची मने जिंकणारी आणि सर्वांना थिरकायला लावणाऱ्या गायिका शाल्मली खोलगडेने लग्न केले आहे.

हो, अतिशय गुपचूप कोणालाही कानोकान खबर न होता शाल्मलीने अतिशय खासगी स्वरूपात तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न केले आहे. शाल्मलीने २२ नोव्हेंबर रोजी मुंबईत फरहान शेखसोबत लगीनगाठ बांधली. फरहान हा मिक्सिंग आणि मास्टरिंग इंजिनिअर असून, हे दोघे मागील सहा वर्षांपासून नात्यात होते. शाल्मली आणि फरहानने त्यांचे लग्न अतिशय गुप्त ठेवले. १ डिसेंबर २०२१ रोजी ते इंडस्ट्रीतील त्यांच्या मित्रपरिवारासाठी खास रिसेप्शन आयोजित करण्याची त्यांनी ठरवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाल्मली आणि फरहान यांना कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत अतिशय खाजगी पद्धतीने हा समारंभ साजरा करण्याची इच्छा होती. आधी त्यांना फक्त नोंदणीकृत विवाह करण्याची इच्छा होती. मात्र पालकांच्या आनंदासाठी त्यांनी घरच्या घरी काही विधी केले आहेत. लग्नाच्याच दिवशी त्यांनी साखरपुडा देखील केला. या सोहळ्याला केवळ १५ लोकं उपस्थित होते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या शाल्मली आणि फरहान यांच्या फोटोंमध्ये सर्वांचेच लक्ष त्या दोघांनी घातलेल्या माळांनी वेधून घेतले. त्यांच्या गळ्यात असलेल्या माळांमध्ये कागदी फुलांसह त्या दोघांचे काही फोटो गुंफलेले होते. अतिशय सध्या पोशाखात या दोघांनी लग्न केले आहे.

शाल्मलीबद्दल सांगायचे झाले तर ती प्रसिद्ध गायिका आहे. तिने इशकजादे सिनेमातील परेशान, दारू देसी, बालम पिचकारी आदी अनेक हिट गाणी गायली आहेत. तिने म्युझिक रियॅलिटी शो, ‘इंडियन आयडॉल ज्युनियर’ आणि ‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये परीक्षकाची जबाबदारी देखील पार पाडली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा