Tuesday, June 18, 2024

भयावह! ‘छोरी’ फेम नुसरतसोबत घडली विचित्र घटना, ३० सेकंदात सोडावं लागलं अभिनेत्रीला हॉटेल

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा नुकतीच ‘छोरी’ या चित्रपटात दिसली आहे. हा चित्रपट ‘लपाछपी’ या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे, ज्यात नुसरत मुख्य भूमिकेत आहे. हा एक हॉरर चित्रपट आहे, ज्यामध्ये नुसरतच्या पात्राचे खूप कौतुक होत आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, जेव्हा नुसरतला विचारण्यात आले की, तिचा भूतांवर विश्वास आहे का आणि तिला आयुष्यात कधी पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी जाणवली आहे का? तेव्हा तिने सांगितले की, तिला एकदा विचित्र अनुभव आला होता. तिला असा काही अनुभव आला होता, ज्यामुळे तिचा जीव धोक्यात आला आणि ती ३० सेकंदातच हॉटेलमधून पळून गेली होती. (chhorii actress nushrratt bharuccha narrates a horrific incident she ran from hotel from 30 seconds)

या मुलाखतीत नुसरत म्हणाली, “भूते असतात यावर माझा लहानपणापासून विश्वास आहे. एकदा मी शूटिंगसाठी दिल्लीला गेले होते आणि एका हॉटेलमध्ये थांबले होते. तिथे मला काहीतरी विचित्र वाटले. त्या खोलीत एक लहान कपाट होते, जिथे मी माझे कपडे ठेवले आणि तिथे सूटकेस ठेवण्यासाठी एक टेबल होता. मी माझी सुटकेस टेबलावर उघडी ठेवली होती, पण सकाळी उठल्यावर सर्व काही पूर्वीसारखे नव्हते. सुटकेस खाली ठेवलेली होती आणि कपडे जमिनीवर पसरलेले होते. मला चांगले आठवते की, झोपायच्या आधी मी सुटकेस तशी ठेवली नव्हती, जशी ती जमिनीवर पडलेली होती. तिथे असे काहीतरी होते, जे नॉर्मल नव्हते.”

आपल्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगताना नुसरत पुढे म्हणाली, “अर्थातच, माझ्या जीवाला धोका असल्यासारखे मला वाटले आणि मी ३० सेकंदात हॉटेल सोडले. खूप भीतीदायक अनुभव होता तो. माझ्या स्टाफने येऊन सगळं पाहिलं तेव्हा तेही म्हणाले की, मॅडम, आपण इथून निघायला हवं.”

नुसरतच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘प्यार का पंचनामा’, ‘प्यार का पंचनामा २’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘छलांग’, ‘ड्रीम गर्ल’, ‘आकाशवाणी’ या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर कंगनाने दाखल केली एफआयआर, म्हणाली ‘मी फालतू धमक्यांना घाबरत नाही’

-जसप्रीत बुमराहसोबत जोडलं जायचं राशी खन्नाचं नाव, तर आज ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री

-पर्यटकांसाठी अडचण बनले कॅटरिना कैफ अन् विकी कौशलचे लग्न? ‘अशी’ झालीय रणथंबोरमध्ये परिस्थिती

हे देखील वाचा