नेहा धुपियाने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये दिसले कॅटरिना आणि विकीच्या लग्नाच्या ठिकाणाचे इनसाइड डेकोरेशन


सध्या बॉलिवूडमध्ये आणि मीडियामध्ये फक्त एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची. कॅटरिना आणि विकी यांचे लग्न हा त्यांच्या चाहत्यांसाठी सुखद धक्काच होता. मात्र आपले आवडते कलाकार लग्नाच्या बेडीत अडकणार म्हटल्यावर फॅन्स देखील खुश झाले. त्या दोघांना वधूवराच्या अवतारात बघण्यासाठी सर्वच उत्सुक होते, मात्र फॅन्सच्या या इच्छेवर कॅटरिना आणि विकी यांनी पाणी फेरले. कारण त्यांनी पाहुण्यांना आणि या लग्नात कोणत्याही बाजूने सामील होणाऱ्या सर्वच लोकांना त्यांचे फोन न वापरण्यास आणि कोणतेही फोटो सोशल मीडियावर पोस्ट न करण्यास सांगण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये या लग्नाचे आणि लग्नाशी संबंधित कोणत्याही गोष्टीचे फोटो लीक होऊ नये यासाठी खूपच जास्त काळजी घेतली जात आहे.

मीडियासोबतच फॅन्स देखील त्यांचे किंवा त्यांच्याशी, त्यांच्या लग्नाशी संबंधित कोणताही फोटो मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. यातच कॅटरिना आणि विकीच्या लग्नाला सामील होणाऱ्या नेहा आणि अंगदने कॅटरिना आणि विकी यांची अट मोडीत काढत त्यांनी या विवाहस्थळावरून काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात सिक्स सेन्स हॉटेलमध्ये लग्नासाठी केलेले डेकोरेशन दिसत आहे.

अंगद आणि नेहा यांनी जरी या फोटोंमध्ये ते नक्की कुठे आहे हे सांगितले नसले तरी, सर्वानाच माहित आहे की, नेहा आणि अंगद कॅटरिना, विकीच्या लग्नात सामील होण्यासाठी राजस्थानमध्ये पोहचले आहेत. नेहा आणि अंगदने त्या दोघांचे रोमँटिक फोटो पोस्ट केले असून, यात नेहाने बॅकग्राऊंड ब्लर करण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र ता यशस्वी झाला नाही. त्यांच्या फोटोच्या मागे असणारे डेकोरेशन पाहून लग्नामध्ये प्रत्येक गोष्टीवर किती खर्च केला आहे, याचाच अंदाज लावला जाऊ शकतो.

नेहाने हे फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “झोपेपासून दुरावलेले पालक जेव्हा पार्टीला जातात. हे अगदी ९० च्या दशकातील वाटत आहे…या गोष्टी आम्ही विसरल्या आहोत. १) पार्टी कशी करायची २) पार्टी कशी करायची ३) पार्टी कशी करायची…” यासोबतच नेहाने #shinyhappypeople ✨ … #photodump हे हॅशटॅग देखील वापरले आहे. नेहाच्या या फोटोंवर कलाकारांसोबतच फॅन्सने देखील कमेंट्स करत हे फोटो कॅटरिना आणि विकीच्या लग्नाचे आहेत ना असे प्रश्न विचारले आहे?

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!