Friday, March 29, 2024

दुःखद! ‘बिग बॉस’ फेम निक्की तांबोळीच्या भावाचे कोरोनाने निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव देशभर सुरू आहे. दररोज कोट्यवधी लोक याला बळी पडत आहेत, तर असंख्य लोकांचा यात जीवही गेला आहे. करमणूक जगदेखील यापासून वाचू शकलेले नाही. यापूर्वी बरीचशे कलाकार याच्या भोवऱ्यात सापडले होते, तर बर्‍याच कलाकारांनी आपला जीवही गमावला आहे. अशीच एक बातमी येत आहे की, ‘बिग बॉस सीझन 14’ च्या पहिल्या चार अंतिम स्पर्धकांपैकी एक असलेल्या निक्की तांबोळी या अभिनेत्रीचा भाऊ जतिन तांबोळीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

निक्की तांबोळीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे ही माहिती दिली आहे. तिने तिचा भाऊ जतिन याचा फोटो शेअर करत, त्याचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. जतिनला काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला होता आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याची माहितीही निक्कीने सोशल मीडियावर दिली होती आणि तिच्या चाहत्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.

निक्कीने भावाच्या फोटोसोबत एक भावनिक कॅप्शनही लिहिले आहे. तिने लिहिले, “आम्हाला ठाऊक नव्हते की, आज सकाळी असे होईल, देव तुला इतक्या लवकर वर बोलवेल. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि हे सर्व पाहून आमच्या सर्वांचे हृदय तुटले आहे. तू फक्त एकटाच गेला नाहीस, आमच्यातील काही भागही तुझ्यासोबत गेला आहे आणि तुझी कमी नेहमीच जाणवत राहील.”

निक्कीने पुढे लिहिले, “तुझे प्रेम आमच्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल. आम्ही आता तुला कधीही पाहू शकणार नाही, परंतु तू नेहमी आमच्या अंतःकरणात आणि आठवणींमध्ये राहशील. तुझ्या जाण्याने आपल्या कुटुंबाची साखळी तुटली आहे, परंतु देव आपल्या सर्वांना एकेक करून वर बोलवेल आणि आम्ही आपण पुन्हा एकत्र होऊ. याचे दुःख कायम राहील, की तू शेवटच्या वेळी आम्हाला काहीही बोलू शकला नाही. जेव्हा आम्हाला हे कळाले, तोपर्यंत तू गेला होतास. जर एकटे प्रेम तुला वाचवू शकले असते, तर हे कधीही झाले नसते. आशा आहे की, कधीतरी पुन्हा आपली भेट होईल. पण मला देवाचे आभार मानायचे आहे की, त्याने तुला आमच्या कुटुंबाचा भाग बनविला आणि माझा भाऊ म्हणून तुला माझ्याकडे पाठविले. तुझ्या आत्म्यास शांती लाभो.”

निक्की तांबोळीची ही पोस्ट पाहिल्यानंतर, तिचे चाहते आणि मित्रपरिवार तिला आणि तिच्या कुटुंबियांना धैर्य आणि हिंमत देत आहेत. अलीकडेच निक्कीने तिच्या भावाच्या त्वरीत बरे होण्यासाठी, प्रार्थना करुन घरी हवन देखील केले होते. ही लढाई जिंकून तिचा भाऊ विजयी व्हावा, अशी प्रार्थना निक्कीने केली होती. तसेच, यापूर्वी निक्कीलाही कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि घरीच क्वारंटाईन राहिल्यानंतर तिने या आजारावर मात केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पैशांसाठी केले तिने ‘कांटा लगा’ या वादग्रस्त गाण्यामध्ये काम; एकाच रात्रीत बनली स्टार

-‘करीना कपूरकडे अशी कोणती गोष्ट आहे, जी तुझ्याकडे नाही?’ राणीचे उत्तर ऐकून बसेल धक्का

-एकेकाळी सुंदर चेहरा नाही म्हणून नाकारली गेली होती इरफान खानची अभिनेत्री, आता बॉलिवूडमध्येे वाजवतेय डंका, वाढदिवशी लिहिली भावुक पोस्ट

हे देखील वाचा