Thursday, July 31, 2025
Home अन्य ‘वहिदा रेहमान यांना भूमिका द्या, त्यांना…’, अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे मोठे विधान; एकदा वाचा

‘वहिदा रेहमान यांना भूमिका द्या, त्यांना…’, अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे मोठे विधान; एकदा वाचा

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना आज कोणत्याही ओळखेची गरज नाही. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी नुकतीच एका पॉडकास्टमध्ये मुलाखती दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्रींना काम मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, केवळ पुरस्कार देऊन ज्येष्ठ अभिनेत्रींना सन्मानित करणे पुरेसे नाही. त्यांना चित्रपट आणि नाटकात काम मिळायला हवे.

निवेदिता सराफ (Nivedita Saraf) सध्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांनी पसंत केली आहे. त्याबरोबरच त्या ‘मी स्वरा आणि ते दोघे’ या नाटकातही काम करत आहेत. नुकतीच निवेदिता सराफ यांनी सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये त्यांनी मनोरंजन क्षेत्रातील काम करण्याचे अनुभव, रंगभूमी व नाटकाविषयी एकूणच निर्माण झालेली अनास्था यावर भाष्य केले.

या मुलाखतीमध्ये निवेदिता सराफ यांनी ज्येष्ठ अभिनेत्रींना काम न मिळण्याबद्दलही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, नुकतंच हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, केवळ पुरस्कार देऊन ज्येष्ठ अभिनेत्रींना सन्मानित करून भागणे पुरेसे नाही. त्यांना चित्रपट आणि नाटकात काम मिळायला हवे.

निवेदिता सराफ म्हणाल्या, “वहिदा रेहमान यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं, पण एवढ्यावरच ते थांबायला नको. त्यांना चित्रपटात भूमिका मिळायला हव्या. त्यांना केवळ एक पुरस्कार देऊन कोपऱ्यात बसवून ठेवणं योग्य नाही.” निवेदिता सराफ यांचे हे मत ज्येष्ठ अभिनेत्रींना काम मिळावे यासाठी महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ अभिनेत्रींनी चित्रपट आणि नाटकांना दिलेले योगदान लक्षात घेता त्यांना काम मिळणं आवश्यक आहे. सध्या निवेदिता सराफ केलेल्या या भाष्याची चर्चा सुरू आहे. (Actress Nivedita Saraf commented on the awarding of Dadasaheb Phalke Award to actress Waheeda Rehman at this year National Film Awards)

आधिक वाचा-
दु:खत! ‘या’ लोकप्रिय मालिका दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव; मनोरंजन विश्वावर शोककळा
ब्रेकिंग! भीम गीतांचा आवाज हरपला; प्रसिद्ध गायिकेचे दु:खद निधन

हे देखील वाचा