Thursday, April 18, 2024

“एक फॅन मूव्हमेंट” निवेदिता सराफ यांच्या नाटकाच्या प्रयोगाला ‘या’ दिग्गज अभिनेत्याची हजेरी

कलाकार फक्त त्यांचे काम करतात आणि मोकळ्या वेळेत आराम करतात असा अनेक लोकांचा समज किंबहुना गैरसमज आहे. कलाकार देखील त्यांना मिळणाऱ्या वेळेत त्यांचे मनोरंजन होईल असे काहीतरी करतात. अनेकदा बऱ्याच कलाकारांना विविध चित्रपटांच्या शो ला, म्युझिक शो ला, नाटकांच्या प्रयोगाला पाहिले जाते. यात हिंदी, मराठी, गुजराती असा कोणताही भेद केला जात नाही. अप्रतिम कलाकृती असेल तर तिला असे कलाकार नक्कीच बघतात आणि दाद देतात.

सध्या मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील जेष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ या मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये सतत काम करताना दिसत आहे. सोशल मीडियावर देखील त्या कमालीच्या सक्रिय आहेत. अशातच सध्या त्यांची एक पोस्ट खूपच गाजत आहे, आणि ती म्हणजे त्यांच्या ‘मी स्वरा आणि ते दोघे’ या नाटकाच्या प्रयोगाला एक दिग्गज कलावंताने हजेरी लावली. निवेदिता यांनी त्यांच्यासोबतच एक फोटो शेअर करत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे.

निवेदिता सराफ यांच्या सध्या अतिशय गाजणाऱ्या ‘मी स्वरा आणि ते दोघे’ या नाटकाच्या प्रयोगाला दिग्गज आणि प्रतिभावान अशा जॉनी लिव्हर यांनी हजेरी लावत नाटकाचा आनंद घेतला. प्रयोग संपल्यानंतर निवेदिता यांनी त्यांच्यासोबत फोटो काढला आणि तो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे.

निवेदिता यांनी हा फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “माझ्यासाठी हा खूप मोठा क्षण आणि एक फॅन मूव्हमेंट होती होता. माझा आवडता अभिनेता आणि आवडते व्यक्ती असणारे जॉनी भाऊ आज ‘मी स्वरा आणि ते दोघे’ हे माझे नाटक पाहायला आले होते. त्यांनी या नाटकाचे आणि माझ्या अभिनयाचे कौतुक केले. मी तुमची मनापासून खूप आभारी आहे, जॉनी भाई”. दरम्यान त्यांच्या या पोस्टवर अनेक नेटकाऱ्यानी कमेंट्स केल्या असून, या फोटोचे कौतुक केले आहे.

तत्पूर्वी सध्या निवेदिता सराफ या त्यांच्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत दिसत असून, सोबतच त्या त्यांचे निवेदिता सराफ रेसिपी नावाचे यूट्यूब चॅनेल देखील चालवतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘खोटी कारणं नका देऊ’ रेस्टोरंटमध्ये ‘या’ कारणासाठी प्रवेश नकारल्यानंतर संतापलेल्या उर्फीने शेअर केली पोस्ट

प्रसिद्ध सेलिब्रिटी सारखे दिसण्याच्या नादान गमावला जीव, कॉस्मेटिक सर्जरीमुळे ‘या’ अभिनेत्याचा दुर्दैवी अंत

हे देखील वाचा