Saturday, July 27, 2024

मराठी चित्रपट न करण्याबाबत अशोक सराफ यांचं मोठ वक्तव्य, म्हणाले, “…म्हणुन मी नकार कळवतो”

चित्रपटसृष्टीमध्ये असंख्य कलाकार आहेत आणि येत राहतील. मात्र, काही कलाकार असे असतात, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक विषेश स्थान निर्माण केले आहे. अशोक सराफ यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. भूमिका कोणतीही असो, त्यामध्ये जिवंतपणा आणण्याचे काम त्यांनी केले आहे. अभिनय तर असा ठसकेबाज की, त्यांचा सिनेमा विसरणे हे कधाच शक्य होणार नाही. आपल्या सर्वांचे लाडके ‘अशोक मामा’ अर्थातच अशोक सराफ होय. नुकतेच त्यांनी मराठी चित्रपट न करण्याबाबत एक वक्तव्य केले आहे.

‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर लाॅंचचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाला चित्रपटातील अभिनेत्रींनीसह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) हे देखील उपस्थित होते. त्यावेळी अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटामध्ये काम करण्याबाबत मोठ वक्तव्य केल आहे.

ते म्हणाले की, “सध्या मी चित्रपट करत नाही. माझ्या वयाची आणि माझ्या स्टाइलची विनोदी कथा लिहिणारा लेखक तरी कुठे आहे? त्यामुळे माझ्या स्टाइलची कथा लिहिणार लेखक कोणीही नाही याचीच मला मोठी खंत मनात सतत टोचत राहते. विनोदी कथा समोर का नाही येत? आणि जे विनोदी कथा लिहितात त्याला कॉमेडी म्हणायचं म्हणजे आपण स्वतःला फसवण्यासारखं आहे. त्यामुळे मी सध्या काही करत नाही. माझ्याकडे कथा येतात. पण मी वाचतो आणि त्यांना नकार कळवतो. कारण मला ते काम करण्याची इच्छा होत नाही”.

पुढे बोलताना ते म्हणालेन, मला जर ती कथा आवडली तरच मी ते काम करणार. जी कथा मला पटत नाही, ते काम मी करत नाही, असेही अशोत सराफ म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या ते पुन्हा चित्रपटांमध्ये दिसणार का? असा प्रश्न चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

अधिक वाचा-
‘आय लव यू’ म्हणत मितालीने सिद्धार्थ चांदेकरचा ‘तो’ फोटो केला शेअर; पहा फोटो
प्राजक्ता माळीने राज ठाकरेंसाठी लिहीली भन्नाट पोस्ट; म्हणाली, ‘तुमच्या आयुष्यातील..’ 

हे देखील वाचा