Monday, October 2, 2023

मलायका अरोराचे वडील रुग्णालयात दाखल, अभिनेत्रीचा आईसोबतचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहाणारी ‘मुन्नी‘ म्हणजेच अभिनेत्री मलायका अरोरा होय. मलायका ही गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर सतत चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वीच मलायकाचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये मलायका बेले डान्स करताना दिसून येत होती. या व्हिडिओमधील मलायकाचा डान्स पाहून चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळून राहिल्या होत्या. याच दरम्यान, मलायकाचा आणखी एक व्हिडिओ धूमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ पाहुन मलायकाचे चाहते चितेंत पडले आहेत.

मलायका सोशल मीडियावप सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या व्हिडिओवर चाहते देखील भरभरून प्रतिसाद देतात. मलायकाचा (Malaika Arora) सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या चाहत्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. मलायकाचा रुग्णालयाबाहेरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, मलायकाच्या वडिलांची तब्येत बरी नाही, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्री मलायका तिच्या आईसोबत तिच्या वडिलांना भेटायला गेली होती. मलायकाच्या वडिलांच्या आरोग्याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. रुग्णालयातून बाहेर येत असताना मलायका अरोराचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

त्या व्हिडिओमध्ये मलायका तिच्या आईसोबत रुग्णालयातून बाहेर पडताना दिसत आहे. या दरम्यान, अभिनेत्री मलायकाने पांढरा टी-शर्ट आणि तपकिरी पॅन्ट परिधान केली आहे. तिच्या चेहऱ्यावर मास्क आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री मलायका घाईत दिसत आहे. मात्र, आतापर्यंत मलायका किंवा तिच्या कुटुंबीयांकडून तिच्या वडिलांच्या तब्येतीबाबत कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. व्हिडिओ पाहूण चाहते चिंतेत पडले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मलायका योग आणि व्यायामा करून स्वत:ला फिट ठेवते. तसेच अभिनेत्री लोकांना निरोगी राहण्यासाठी टिप्सही देत ​​असते. ज्यासाठी अभिनेत्री मलायका अनेकदा व्हिडीओद्वारे योगासनाविषयी माहिती देत ​​असते. जर तुम्हालाही मलायकाप्रमाणे तंदुरुस्त व्हायचे असेल तर तुम्ही तिचा योगा फॉलो करू शकता. (That video of actress Malaika Arora outside the hospital went viral)

अधिक वाचा- 
ब्रेकिंग! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर हळहळली
कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, “तुमच्या…”

हे देखील वाचा