Saturday, September 7, 2024
Home टेलिव्हिजन ‘कचरापेटीतलं अन्न खाऊन काढले दिवस’; ‘बिग बॉस’मधील स्पर्धकाची कहाणी ऐकून पूजा भट्ट ढसाढसा रडली

‘कचरापेटीतलं अन्न खाऊन काढले दिवस’; ‘बिग बॉस’मधील स्पर्धकाची कहाणी ऐकून पूजा भट्ट ढसाढसा रडली

बिग बॉस ओटीटी 2‘ मध्ये दररोज काहीतरी नवीन पाहायला मिळत आहे. पुनित सुपरस्टारचे शोमध्ये पुनरागमन असो किंवा आकांक्षा पुरी आणि अविनाश सचदेव यांची भांडणे असो. ‘बिग बॉस‘मधील स्पर्धक रोज एक नवीन कागीतरी करताना दिसतात. या सगळ्या दरम्यान, काही कुटुंबातील सदस्य देखील त्यांच्या सह-स्पर्धकांसोबत चांगले बाँडिंग करताना दिसतात. स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित किस्से आपापसात शेअर करत आहेत.

शोमध्ये स्पर्धकही फुल फॉर्ममध्ये आले आहेत. या सगळ्यामध्ये ‘बिग बॉस‘च्या (Bigg Boss) घरातील सदस्य त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे करत आहेत. मनीषा राणी आणि पूजा भट्टनंतर आता जैद हदीद त्याच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितले आहे. जैद ‘बिग बॉस ओटीटी सीझन 2’च्या स्पर्धकांपैकी एक आहे. जैदने काही खाजगी आयुष्याशी संबंधीत खुलासे केले आहेत. मॉडेल जैद हदीदची कहाणी ऐकून पुजा भट्ट (Pooja Bhatt) ढसाढसा रडली आहे.

जैद हदीद बालपणी केलेल्या संघर्षाबद्दल बोलताना म्हणाला की, “1984 साली माझी आई गरोदर होती. तेव्हा माझा जन्म झाला. त्यावेळी माझ्या आईचे आणि वडिलांचे वाद झाले होते. त्यावेळी माझे वडिल कुठे तरी निघून गेले होते. ते पुन्हा कधीच घरी येणार नाहीत, असे माझ्या आईला वाटू लागले होते. त्यावेळी फोन देखील नव्हते. एक दिवस अचानक माझे वडिल घरी आले. त्यावेळी त्यांनी माझ्या आईला घटस्फोट दिला. त्यावेळी आईने मला शेजारच्या दारात सोडल आणि आई तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली.”

पुढे बोलताना जैद म्हणाला की, “आईने त्यावेळी मला नसुपरमार्केटला जात असल्याचं सांगितलं होतं. पण तेव्हा मला या गोष्टीची कल्पना देखील नव्हती. आईने ही गोष्ट मला 17 वर्षीनी सांगितली. पण मला आईने ज्या ठिकाणी सोडल होत तिथेच मी आठवडाभर राहिलो.तिथल्या कचरा कुंडीत जवळच्या रेस्टॉरंटमध्ये उरलेले अन्न टाकायचे, तेच मी खायचो. एक दिवस तेथिल शेजारी आले आणि मला त्यांच्या घरी घेउन गेले. त्यांनी अनेकदा दार ठोठावले पण कोणाच दरवाजा उघडला नाही. काही दिवसांनी ते घर विकल्याच आम्हाला समजले.”

तसेच, “मी माझी आईला शोधून काढल. त्यावेळी मी माझ्या आईला सगळी कागद पत्र दाखवली. तेव्हा कुठे आईचा माझ्यावर विश्वास बसला. पण खूप काळ आम्ही सोबत राहिलो. आम्ही भेटल्यावर आईचे लगेच निधन झाले. त्यावेळी ती मला साॅरी म्हणाली होती. तिने माझी माफी मागावी असं मला कधीच वाटलं नाही. आईला वाटलं की मी माझ्या वडिलांसोबत राहायचो, पण तसं नव्हतं.” असेही जैदने सांगितले. त्याची ही कहाणी ऐकून पूजा भट्ट खूप रडली. (Pooja Bhatt cried profusely after hearing the story of ‘Bigg Boss’ contestant Jaad Hadid)

 अधिक वाचा- 
अफेअरच्या चर्चेदम्यान इब्रहिम अली खान अन् पलक तिवारीचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव
‘गुलशन कुमारांच्या हत्येप्रकरणी मला पोलिसांनी ताब्यात घेतल आणि…’, मानव कौलचा धक्कादायक खुलासा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा