नोरा फतेहीलाही खूप आवडायचा सुकेश चंद्रशेखर, चॅटमध्ये बोलायचा ‘अशा-अशा’ गोष्टी


गेल्या अनेक दिवसांपासून सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) यांची नावे चर्चेत आहेत. जॅकलिनवर सुकेशकडून महागडे गिफ्ट्स आणि लक्झरी वस्तू घेतल्याचा आरोप आहे. याशिवाय ती सुकेशसोबतच्या नात्यामुळेही वादात सापडली आहे. जॅकलिन व्यतिरिक्त आणखी एका अभिनेत्रीची तार सुकेशशी संबंधित आहे, जीचे नाव नोरा फतेही (Nora Fatehi) आहे. जॅकलिनप्रमाणेच सुकेशकडून महागडे फोन आणि लक्झरी वस्तू घेतल्याचा आरोपही नोरावर आहे. या आरोपांदरम्यान आता नोरा आणि सुकेश चंद्रशेखर यांचे चॅट समोर आले आहे. या चॅटमधून अनेक गुपिते उघड झाली आहेत.

कार आवडते का?
माध्यमांतील वृत्तानुसार, चंद्रशेखर नोराला महागडे गिफ्ट्स द्यायचा. या चॅटमध्ये एका ठिकाणी चंद्रशेखरने नोराला विचारले की, “तुला रेंज रोव्हर कार आवडते का?” यावर नोराने उत्तर दिले “होय, ही चांगली रफ युज कार आहे आणि स्टेटमेंट कार देखील आहे.” यानंतर सुकेशने अभिनेत्रीला सांगितले की, “मी तुला आणखी पर्याय देईन.”

नोरालाही आवडायचा सुकेश
दुसर्‍या चॅटमध्ये सुकेशने नोराला लिहिले की, “तू १ मिनिट बोलू शकतेस का, मला आनंद होईल आणि यासाठी मी तुझी प्रशंसा करेन. ही भेट का दिली गेली याचा विचार तू किंवा तुझी एजन्सी करणार नाही अशी आशा आहे. मी तुम्हाला एवढेच सांगू इच्छितो की, हे कोणत्याही हेतूने दिले जात नाही. जेव्हा तुला एखादी व्यक्ती आवडते तेव्हा त्यांना भेटवस्तू द्या. फक्त यामुळे मी हे करत आहे आणि दुसरे काही नाही.”

नोरा होणार साक्षीदार
नोरा फतेही आता सुकेश चंद्रशेखरच्या विरोधात साक्षीदार म्हणून दिसणार असल्याच्या बातम्या येत आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्रीने नुकत्याच ईडीकडे केलेल्या चौकशीत तिच्यावरील आरोप फेटाळले होते. यासोबतच अनेक खुलासेही करण्यात आले. सुकेशची पत्नी लीना पॉल चेन्नईतील एका कार्यक्रमात सहभागी झाल्याच्या बदल्यात नोराला बीएमडब्ल्यू कार आणि आयफोन भेट म्हणून देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. नोराने चौकशीदरम्यान हा आरोप फेटाळून लावला आहे. नोरा म्हणते की, तिला जे काही भेटवस्तू मिळाल्या, त्या कार्यक्रमाच्या वेळीच भेटवस्तू म्हणून दिल्या गेल्या.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!