असे काय घडले की, सेटवर नोरा फतेहीला पडली स्ट्रेचरची गरज; व्हिडिओ पाहून चिंतेत पडले चाहते


अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या कामाबद्दल खूप सिरियस असते. सेटवर जखमी होऊनही ती अनेकदा काम करताना दिसली आहे. आता ताजे उदाहरण म्हणजे तिचा नवीन म्युझिक व्हिडिओ ‘डान्स मेरी रानी’. गुरू रंधावा (Guru Randhawa) याने गाण्याच्या सेटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीला स्ट्रेचरवरून नेताना दिसत आहे.

‘यामुळे’ नोराला पडली स्ट्रेचरची गरज
व्हिडिओमध्ये नोरा एका जलपरीच्या पोशाखात दिसत आहे. या ड्रेसमुळे नोराला हालचाल करता येत नव्हती, त्यामुळे तिला स्ट्रेचरवर उचलावे लागले. अभिनेत्रीला स्ट्रेचरवर उचलून बोटीतून खाली पाण्यात आणण्यात आले. हा व्हिडिओ शेअर करून गुरु रंधावाने (Guru Randhawa) घरी हा प्रयोग न करण्याचा सल्ला दिला आहे. व्हिडिओमध्ये क्रू मेंबर्ससोबत गुरु देखील स्ट्रेचर उचलताना दिसत होते. नोराही थोडी घाबरलेली दिसत होती.

या व्हिडिओपूर्वी गुरु रंधावाने नोरासोबतच्या त्याच्या आगामी म्युझिक व्हिडिओमधील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये नोरा पाण्यात बसली होती आणि गुरू तिच्याकडे पाहत होता. या गाण्याचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. भुरे केस आणि जलपरीचा पोशाख परिधान केलेली नोरा पूर्णपणे वेगळी दिसते.

गुरुसोबतच्या अफेअरची झाली चर्चा
काही काळापूर्वी या दोघांचे आणखी काही फोटो व्हायरल झाले होते. दोघेही गोव्यात समुद्रकिनारी फिरताना दिसले. त्यांना एकत्र पाहिल्यानंतर चाहते त्यांच्या अफेअरबद्दल अंदाज लावत होते. मात्र, आता हे दोन्ही स्टार्स ‘डान्स मेरी रानी’ व्हिडिओ शूटसाठी गोव्यात एकत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. नोरा आणि गुरु रंधावाने यापूर्वी ‘नाच मेरी रानी’ या व्हिडिओमध्ये एकत्र काम केले आहे.

नोराच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर अलीकडेच ‘भुज – द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटातील तिची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती. तसेच या चित्रपटात अजय देवगण तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसला. एवढेच नाही, तर नोरावर चित्रित केलेली गाणी सुपरहिट होत आहेत. तिची फॅन फॉलोविंग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नोराने ‘दिलबर’ आणि ‘गर्मी’ सारख्या गाण्यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे. नोरा ‘बिग बॉस’चाही एक भाग राहिली आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!