बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँने निखिल जैनसोबत केलेले लग्न भारतात बेकायदेशीर असल्याचा दावा केल्यानंतर, तिने पुन्हा एकदा यश दासगुप्तासोबतचे तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात दोघेही हसताना दिसत आहेत. पहिला फोटो पाहिल्यानंतर आता सोशल मीडिया युजर्स आणि नुसरतच्या काही चाहत्यांना याचे सत्य जाणून घ्यायचे आहे. दोघे एकत्र का आहेत याचा खुलासा तिने स्वतः केला आहे.
नवीन नात्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा नाही केली
पश्चिम बंगालमध्ये, टीएमसी खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ तिच्या मुलाच्या जन्मापासून अभिनेता यश दासगुप्तासोबत बराच वेळ घालवत आहे. बर्थडे पार्टी, दसरा, काश्मीर ट्रिप आणि त्यानंतर दिवाळीचे असे काही फोटो समोर आले, जे पाहिल्यानंतर या दोघांच्या लग्नाबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. या फोटोंमध्ये नुसरतच्या भांगेत कुंकूही दिसत होते. मात्र आतापर्यंत तिने या नात्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
नुसरत जहाँने का मागितले आशीर्वाद?
नुसरतने यशसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “आम्हला आशीर्वाद द्या.” आता नुसरतने आशीर्वाद का मागितले ते जाणून घेऊया. खरंतर, स्वतःच्या आणि यश दासगुप्ताच्या फोटोसोबत, तिने आणखी दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो दोघांच्या नवीन चित्रपटाच्या मुहूर्तातील आहेत, ज्याचा उल्लेख नुसरतने हॅशटॅगमध्ये केला आहे.
यश दासगुप्ताने चित्रपटाच्या मुहूर्ताचा फोटो केला शेअर
त्याचवेळी यश दासगुप्तानेही मुहूर्ताचा फोटो शेअर करून चित्रपटाविषयी माहिती दिली. त्याने लिहिले की, “माझ्या पुढच्या ‘मास्टरमोशाय अपनी किछू देखेनी’ या चित्रपटाचा मुहूर्त. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद हवा आहे.”
नुसरत-निखिलचे लग्न कोलकाता कोर्टाने ठरवले अवैध
नुकतेच कोलकाता कोर्टाने नुसरत-निखिलचे लग्न अवैध ठरवले आहे. न्यायालयाने सांगितले की, या जोडप्याने कायदेशीररित्या लग्न केलेले नाही. विवाह रद्द ठरवताना न्यायालयाने म्हटले आहे की, “याद्वारे वादी आणि प्रतिवादी यांच्यातील बोडरम, तुर्की येथे १९ जून २०१९ रोजी झालेला कथित विवाह कायदेशीररित्या वैध नाही असे घोषित करण्यात आले आहे.” अशा प्रकारे प्रकरणाचा निकाल लावण्यात आला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कार्तिक आर्यनने ‘दोस्ताना २’बद्दल सोडले मौन, चित्रपटातून बाहेर काढण्याबद्दल केले मोठे वक्तव्य
-चहुबाजूंनी विरोध होत असताना, कोमेडियन वीर दासच्या समर्थनार्थ आली काम्या पंजाबी; म्हणाली…