प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एसएस राजामौली (S.S.Rajamouli) यांचा ‘आरआरआर’ चित्रपट सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाची कथा लोकांना चांगलीच आवडली असून, प्रेक्षकांचा चित्रपटाला जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण (Ram Charan), ज्युनिअर एनटीआर (Jr.NTR), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगण (Ajay Devgn) अशा दिग्गज अभिनेत्यांच्या भूमिका पाहायला मिळत आहेत. मात्र चित्रपटात सर्वांचे लक्ष ऑलिविया मॉरिस (Olivia Morris) या अभिनेत्रीने वेधले आहे. कोण आहे ही चर्चित अभिनेत्री चला जाणून घेऊ.
सध्या सगळीकडे आरआरआर चित्रपटाची चर्चा सुरू आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चा होतेय ती ऑलिविया मॉरिसची. चित्रपटात ऑलिविया मॉरिस आणि ज्युनिअर एनटीआरची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. यामध्ये ऑलिविया मॉरिसच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. या चित्रपटात तिने जेनिफरची भूमिका साकारली आहे.
मोरिसने २०१७ मध्ये Macbeth adaptation सोबत आपल्या अभिनयाची सुरूवात केली होती. मॉरिसने रॉयल वेल्श कॉलेजमधून संगीताचे आणि नाटकाचे शिक्षण घेतले आहे. ‘आरआरआर’ चित्रपटात येण्याआधी ती स्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत होती. आपल्या अभिनयाप्रमाणेच ती सोशल मीडियावरही सतत सक्रिय असते. मॉरिसचे इंस्टारग्रामवर एक लाखापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. २०१८ मध्ये ती एका गाण्यातही झळकली होती.
दरम्यान सध्या ‘आरआरआर’ चित्रपटाने कमाईचे नवनवीन रेकॉर्ड करायला सुरूवात केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसाच्या कमाईत ‘बाहुबली’च्या कलेक्शनशी बरोबरी केली आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ तेलुगू आदी भाषांमध्ये एकाचवेळी प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या आधीपासून हा चित्रपट चर्चेत आला होता. तसेच कन्नड भाषेत चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याने, चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –