‘उगवत्याला दंडवत’ हा चित्रपटसृष्टीचा एक अलिखित नियम आहे. मात्र, सध्याच्या सोशल मीडियाच्या आधुनिक काळाने इंडस्ट्रीतून गायब झालेल्या किंवा आता चित्रपटांमध्ये सक्रिय नसलेल्या अभिनेत्रींना देखील लाईमलाईट्मधे राहण्याची संधी दिली आहे. अशा अनेक अभिनेत्री आहे ज्यांनी या इंडस्ट्रीमध्ये एक काळ गाजवला आणि आता सोशल मीडियादेखील गाजवत आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी चित्रपटांमध्ये काम कमी केले असले, तरीही त्यांची लोकप्रियता मोठमोठ्या अभिनेत्री एवढीच आहे.
अशीच एक अभिनेत्री म्हणजे पूजा बत्रा. पूजाला कोणत्याच विशिष्ट ओळखीची पूजाने ९० च्या दशकामध्ये तिच्या अभिनयाने आणि तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली. आज पूजाने वयाची ४५ गाठली आहे. मात्र, तरीही ती २० वर्षाचीच दिसते इतके फिट आणि फाइन तिने स्वतःला ठेवले आहे. सध्या पूजा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे पूजाने नुकताच पोस्ट केलेला तिचा बोल्ड आणि ब्युटीफुल फोटो. तिच्या या फोटोंनी इंटरनेटवर आग लावली आहे.
पूजाने पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमधील फोटो शेअर केले असून, हे प्रचंड फोटो व्हायरल होत आहे. पांढऱ्या रंगाच्या बिकिनीसोबत तिने घातलेले लाल रंगाचे कानातले तिच्या सौंदर्याला चार चाँद लावत आहे. पूजाने तिचे हे फोटो पोस्ट करताना लिहिले, “चाळीशीत असण्याचाही एक वेगळा अनुभव आहे.”
पूजा या फोटोंमध्ये अतिशय मादक आणि आकर्षक वाटत आहे. हे पहिल्यांदा नाही की पूजाने तिचे हॉट फोटो पोस्ट केले, याआधी देखील पूजाने तिचे अनेक हॉट आणि मादक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पूजाबद्दल सांगायचे झाले, तर पूजाने १९९३ साली ‘फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल’चा ताज मिळवला आहे. पूजाने १९९७ साली आलेल्या प्रियदर्शनच्या ‘विरासत’ सिनेमातून हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. नुकतेच या चित्रपटाने २४ वर्ष पूर्ण केले, त्यानिमित्ताने पूजाने एक पोस्ट आणि काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते.
पूजाने विरासतसोबत ‘हसीना मान जायेगी’, ‘भाई’, ‘कही प्यार ना हो जाये’, ‘दिल ने फ याद किया’, ‘जोडी नं १’, ‘नायक’, ‘तलाश’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१९ साली पूजाने अभिनेता नवाब शाहसोबत लग्न केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…