सोनम कपूरच्या वाढदिवशी वडील अनिल कपूरने केला बालपणीचा फोटो शेअर; म्हणाले, ‘मला तुझी खूप आठवण येतेय…’

On Birthday of Actress Sonam Kapoor Anil Kapoor Shares Her Childhood Pictures


बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने आपल्या अभिनयाने आणि फॅशन स्टाईलमुळे चांगलीच प्रसिद्ध आहे. बुधवारी (९ जून) सोनम आपला ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तान तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण तिला वाढदविसाच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र, या सर्वांमध्ये एका खास व्यक्तीने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ती व्यक्ती इतर कुणी नसून तिचे वडील आणि सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर हे आहेत. त्यांनी सोनमला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

अनिल कपूर यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर सोनमचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये  ती खूपच क्यूट दिसत आहे. फोटो शेअर करत अनिल कपूर यांनी आपल्या मुलीची प्रशंसादेखील केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, ते सोनमची खूप आठवण काढतात. अनिल कपूर यांनी लिहिले की, “आई- वडील म्हणून तुला दररोज पुढे जाताना पाहणे स्वप्नपूर्तीप्रमाणे आहे. मी निश्चितच मुलांच्या बाबतीत सर्वात भाग्यवान आहे. मी खूप आभारी आहे की, तू आणि आनंद सुरक्षित आणि निरोगी आहात. आम्ही पुन्हा तुमच्यासोबत राहण्याची वाट पाहत आहोत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सोनम बेटा! माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे आणि मला तुझी खूप आठवण येत आहे.”

अनिल कपूर यांच्या पोस्टवर कमेंट करत मुलगी सोनमने लिहिले की, “बाबा मी तुमच्यावर खूप प्रेम करते. तुमची खूप आठवण येत आहे.” अनिल कपूर यांच्या पोस्टवर कमेंट करत चाहते सोनम कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. एका युजरने कमेंट करत ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सोनम कपूर,’ असे लिहिले आहे.

तीन वर्षांपूर्वी म्हणजेच ८ मे, २०१८ रोजी सोनमने व्यावसायिक आनंद अहुजासोबत लग्न केले होते. तो लंडनमधील एक प्रसिद्ध व्यावसायिक आहे. माध्यमातील वृत्तानुसार, आनंदचे वार्षिक उत्पन्न ४५० मिलियन यूएस डॉलर्स इतके आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार ही रक्कम तब्बल ३००० कोटी रुपये इतकी आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.