सनी लिओनीने हवेत उडून केला जबरदस्त स्टंट; व्हिडिओ शेअर करत म्हणते, ‘आता माझी सटकली’


सनी लिओनी हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. खूप कमी कालावधीमध्ये सनीने या बेभरवशाच्या क्षेत्रात स्वतः ला सिद्ध केले आहे. सनीने आता पॉर्नस्टार ही ओळख पुसत अभिनेत्री ही नवीन ओळख मिळवली आहे. ‘जिस्म २’ या पूजा भट्टच्या सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणाऱ्या सनीने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. इंस्टाग्रामवर सनीला ४५ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.

मागच्या अनेक काळापासून सनी कोणत्याच सिनेमात दिसली नाही. मात्र, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत फॅन्सच्या संपर्कात असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमी तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करताना दिसते. सध्या सनी पुन्हा एकदा चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे सनीचा नुकताच व्हायरल झालेला व्हिडिओ. सनीने तिचा तिच्या सेटवरच एक छोटा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत भन्नाट कॅप्शन दिले आहे.

सनीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती केबल्सला बांधलेली दिसत असून खाली एक व्यक्ती झोपलेली दिसत आहे. हा सीन एक ऍक्शन सीन असून यात सनी हवेत असून, तिला केबल्सच्या साहाय्याने खाली सोडण्यात येते. हा स्टंट व्हिडिओ पाहून सनीचे चाहतेही हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ शेअर करत सनीने “आता माझी सटकली,” असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.

हा अगदी छोटा १० सेकंदाचा व्हिडिओ खूपच कमी वेळात व्हायरल झाला असून आता पर्यंत ५ लाखांपेक्षाही अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. फॅन्ससोबतच, कलाकारांनी देखील तिच्या या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर ती लवकरच ‘शेरो’ आणि ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.