×

प्रियांका अन् निकच्या बाळाचा फोटो झाला लीक? होऊ लागलाय जोरदार व्हायरल

नुकतेच प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) आई-वडील झाले आहेत. या दाम्पत्याने सरोगसीद्वारे एका मुलीचे स्वागत केले आहे. चाहत्यांसह अनेक कलाकारांनी प्रियांका आणि निकला पालक बनल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी जगभरातील चाहते उत्सुक आहेत. प्रियांकाने बाळाच्या दिलेल्या या माहितीनंतर काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होऊ लागले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो इकडून तिकडे फिरत आहेत. (priyanka chopra nick jonas baby photo leaked on instagram)

या फोटोमध्ये निक आणि प्रियांका एका मुलाला हातात धरून त्याच्यासोबत खेळत आहेत. प्रियांका त्याच्याकडे टक लावून प्रेमाने न्याहाळत आहे. हा फोटो इंटरनेटवर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी या जोडप्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. खरं तर सत्य काही वेगळंच आहे. हा फोटो निक आणि प्रियांकाच्या बाळाचा नाही. हा एक जुना फोटो आहे.

View this post on Instagram

A post shared by JB LOVER (@camprockfp)

२ आठवड्यांपूर्वी आई बनली प्रियांका
रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी दिलेल्या तारखेच्या १२ आठवड्यांपूर्वी प्रियांकाच्या मुलीचा जन्म झाला आहे. या जोडप्याच्या मुलीचा जन्म लास वेगासच्या बाहेरील दक्षिण कॅलिफोर्नियातील रुग्णालयात झाला. प्री-मॅच्युअर डिलिव्हरीमुळे बाळ काहीसे अशक्त आहे. यामुळे, निक-प्रियांका यांनी ठरवले आहे की, जोपर्यंत मूल पूर्णपणे निरोगी होत नाही तोपर्यंत ते रुग्णालयातच राहील. बाळाची डिलिव्हरीची तारीख एप्रिलमध्ये असल्याचे बोलले जात होते. यामुळे प्रियांकाने तिच्या कामाच्या सर्व कमिटमेंट्सही पूर्ण केल्या होत्या. जेणेकरून बाळाच्या जन्मानंतर तिला मातृत्वाचा आनंद घेता येईल. बाळाच्या जन्माच्या एक आठवड्यानंतर प्रियांकाने गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

हेही वाचा :

Latest Post