×

बाप रे! स्टंट दाखवण्यासाठी स्पर्धकाने टाकला जीव धोक्यात, सेटवर लागलेल्या आगीने उडाला एकच गोंधळ

‘इंडियाज गॉट टॅलेंट’ हे एक असे व्यासपीठ आहे, जिथे देशभरातील विविध प्रकारचे प्रतिभावान लोक त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी येतात. यातील काही स्पर्धक त्यांच्या विचित्र टॅलेंटने जजला हसवतात, तर काही धोकादायक स्टंट्स करून त्यांना चकित करतात. पण यातील काही स्टंट असेही असतात, ज्यामुळे स्पर्धकांचा जीव धोक्यात येतो. नुकतेच असेच काहीसे पाहायला मिळाले.

सोनी टीव्हीने आपल्या इंस्टाग्रामवर ‘इंडियाज गॉट टॅलेंट’चा नवीन प्रोमो जारी केला आहे. या प्रोमोमध्ये, प्रीतम नाथ नावाच्या स्पर्धकाने शोच्या मंचावर न्यायाधीशांना आपली अद्वितीय प्रतिभा दाखवण्याचा प्रयत्न केला. प्रीतम नाथने आपल्या पराक्रमाबद्दल सांगितले की, त्याला झोपडीत बंद करून आग लावावी. तो म्हणाला, “मला बंदिस्त केले जाईल. घराला आग लावली जाईल. घर पूर्णपणे जळून खाक होईपर्यंत मला घरातून बाहेर पडावे लागेल.” मात्र, स्टंट सुरू झाल्यानंतर काही वेगळेच पाहायला मिळते. (indias got talent 9 contestant trapped in fire judges got panicked latest promo)

स्पर्धकाचा वाचवा वाचवा आवाज ऐकून बादशाह (Badshah) लगेचच आपल्या जागेवरून उठला. दरम्यान, त्याचा कॅमेरा बंद होतो. त्यानंतर तो म्हणताना दिसतो की, टीव्हीवर काहीही दिसत नाही. अशा स्थितीत त्याने बाहेर जाऊन बजर दाबला. त्याने कार्य थांबवण्यास सांगितले. त्यानंतर बादशाहने पाणी मारून फायर ब्रिगेड ऑन करण्यास सांगितले. स्पर्धक प्रीतमचा खोकल्याचा आवाज ऐकून शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) चांगलीच घाबरली आणि आरडाओरडा करू लागली. प्रोमोमध्ये ज्या प्रकारचा गोंधळ दिसला आहे, ते पाहून आगामी भाग खूपच धोकादायक दिसत आहे.

मात्र, स्टंट करताना असा अपघात प्रत्यक्षात घडतो की, तो केवळ प्रमोशनचा भाग आहे, हे येणारा भागच सांगेल. यावेळेस या शोला शिल्पा शेट्टी, किरण खेर (Kirron Kher) आणि बादशाह यांनी जज केले आहे. शिल्पा शोच्या सेटवरील मजेदार बीटीएस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते, ज्यांना खूप पसंती दिली जाते.

हेही वाचा :

Latest Post