×

छोट्या कपड्यांमध्ये थंडीने थरथरू लागली अनन्या; सिद्धांतने केलं असं काही, बघतच राहिली मीडिया

अनन्या पांडे (Ananya Panday), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांचा ‘गेहराइयां’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणने बरेच बोल्ड सीन्स दिले आहेत, जे सध्या चर्चेत आहेत. दरम्यान, हे तिन्ही कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशातच अनन्या चर्चेत आली आहे. यावेळी अनन्याने असे कपडे घातले की, ती थंडीने थरथरू लागली. यानंतर तिचा को-स्टार सिद्धांतला तिला थंडीपासून वाचवण्यासाठी त्याचे जॅकेट द्यावे लागले.

थंडीने थरथरू लागली अनन्या
या व्हिडिओमध्ये अनन्या पांडेने क्रीम कलरची पॅंट घातलेली दिसत आहे. यासोबत तिने ब्राउन कलरचा ब्रालेट घातला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्री अचानक थंडीने थरथर कापायला लागली. त्यानंतर तिचा को-स्टार सिद्धांत चतुर्वेदीने त्याचे जॅकेट काढले आणि ते तिला घातले.

जॅकेट घालून दिल्या पोझ
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सिद्धांतने अनन्याला जॅकेट घालताच तिला थंडीपासून थोडा आराम मिळाला. यानंतर तिने सिद्धांतसोबत मीडियासमोर पोझ दिल्या.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

प्रमोशनमध्ये अनन्यासोबत दीपिकानेही जोडला हॉटनेसचा टच
विशेष बाब म्हणजे, अनन्या पांडे व्यतिरिक्त दीपिकानेही चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रिव्हिलिंग ड्रेस परिधान केला होता. दीपिकाने केशरी रंगाचा ड्रेस घातला होता, ज्यामध्ये ब्रेस्टच्या बाजूने अनेक कट होते.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

एका सीनसाठी दिले ४८ टेक
या चित्रपटात दीपिकाने जबरदस्त किसिंग सीन्स दिले आहेत. फिल्म कंपेनियनला दिलेल्या मुलाखतीत, तिने शकुन बत्रा आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. शकुनने एका सीनसाठी ४८ टेक घेतल्याचे दीपिकाने उघड केले. ‘गेहराइयां’च्या ट्रेलर लॉन्चवेळी दीपिकाने चित्रपटाच्या इंटिमेट सीनबद्दलही सांगितले. दीपिकाचे म्हणणे आहे की, एका सीनसाठी ४८ टेक देणे सोपे नव्हते.

रिलीझसाठी सज्ज आहे ‘गेहराइयां’
दीपिका, सिद्धांत आणि अनन्यासोबत ‘गेहराइयां’ चित्रपटात घैर्य कारवां देखील दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केले असून, चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे. हा चित्रपट ११ फेब्रुवारी २०२२ रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

Latest Post