×

‘पुष्पा’च्या यशानंतर चमकलं अल्लू अर्जुनचं भाग्य! तब्बल ‘इतक्या’ कोटीत ऑफर झाली एटलीची फिल्म

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा’ चित्रपटाच्या कमाईचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अजूनही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची लाट पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनाचा हा दमदार चित्रपट फक्त दाक्षिणात्य भागात नव्हे, तर इतरही अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने सगळीकडेच कमाईचे नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. त्यामुळेच अल्लू अर्जुनाच्या अभिनयाची जादू सगळ्यांवर पसरली आहे, असं म्हणावं लागेल.

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनाच्या दमदार अभिनयाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. त्यामुळे त्याला कॉमेडी, डान्स, ऍक्शन सगळ्याच क्षेत्रातील यशस्वी अभिनेता अशी ओळख मिळाली आहे. या चित्रपटाच्या यशाने अल्लू अर्जुनची लोकप्रियता आणखी वाढली आहे. या चित्रपटानंतर त्याला अनेक नव्या चित्रपटांच्या ऑफर्स तर आल्याच, सोबत त्याला मिळणाऱ्या मानधनात ही भलीमोठी वाढ झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

दरम्यान अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपटांच्या कमाईचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. या चित्रपटाच्या घवघवीत यशामुळे यामधील कलाकारांचेही वजन चांगलेच वाढले आहे. चित्रपटातील आपल्या दर्जेदार अभिनयाने अल्लू अर्जुन फक्त दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही, तर संपूर्ण देशात लोकप्रिय ठरला आहे. या चित्रपटाच्या यशाने अल्लू अर्जुन आता सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. त्याच्या पुष्पा चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत, तब्बल ३०० कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे साहजिकच अल्लू अर्जुनलाही या लोकप्रियतेचा फायदा झाला आहे. त्याच्याकडे अनेक चित्रपटाच्या ऑफर आल्या आहेत, सोबतच त्याला मिळणार्‍या मानधनातही मोठी वाढ झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

समोर आलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन आता एटलीसोबत आपल्या आगामी चित्रपटात काम करणार आहे. लायक्रा प्रॉडक्शनने आपल्या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनची निवड केल्याची बातमी समोर आली आहे. यासाठी अल्लूला तब्बल १०० कोटी रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. आपल्या शानदार दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या एटलीने ‘थेरी’, ‘मार्सल’, आणि ‘बिजिल’ सारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामुळे आता एटली आणि अल्लूची जोडी कोणता धमाकेदार चित्रपट घेऊन येणार याकडेच सगळ्यांच लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

Latest Post