Thursday, July 18, 2024

पहिल्यांदा मंगळसूत्र घातल्यानंरची देसी गर्लने केली भावना व्यक्त, म्हणाली, ‘काळे मनी वाईटापासून दूर ठेवण्यासाठी…

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्नानंतर अनेकदा मंगळसूत्र घातलेल्या सामान्य भारतीय महिलेसारखी दिसते. नुकतेच तिने मंगळसूत्राबाबतचे तिचे विचार मांडले आहेत. प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर ज्वेलरी ब्रँडचा ब्रँड एंडोर्समेंट व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने आधुनिक मंगळसूत्र सादर केले आहे.

इतकंच नाही, तर पहिल्यांदा मंगळसूत्र घातले तेव्हा कसे वाटले हे तिने सांगितले आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात प्रियांकाने (Priyanka Chopra) सांगितले की, अमेरिकन अभिनेता आणि गायक निक जोनासशी (Nick Jonas) लग्न केल्यानंतर तिने पहिल्यांदा हे मंगळसूत्र घातले होते, हा तिच्यासाठी खूप खास क्षण होता. लग्नानंतर मंगळसूत्र घालण्याबाबत प्रियांकाने सांगितले की, त्याचे महत्त्व काय आहे, या विचारानेच आपण मोठे झालो आहोत. हे माझ्यासाठी खूप खास आहे. तसेच एक आधुनिक स्त्री म्हणून मला त्याचे महत्त्व कळते.

प्रियांका म्हणाली की, “मला मंगळसूत्र घालायला आवडते की, हे देखील पितृसत्ताक आहे? माझ्याबद्दल बोलत असेल तरी, मी ती पिढी आहे, जी मध्यभागी आहे, ज्यांना परंपरा जपायची आहे आणि त्यांच्या परंपरा पुढे न्यायच्या आहेत. तुम्ही कोण आहात हे तुम्ही समजून घेत आहात, तुम्ही पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व करता आणि पुढच्या पिढीतील मुली हे वेगळे कसे करू शकतात ते पाहा.” व्हिडिओमध्ये तिने मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचा वापर आणि महत्त्वही सांगितले आहे. तिने सांगितले की, “काळ्या मण्यांचा वापर मुळात वाईटापासून दूर ठेवण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी केला जातो.”

प्रियांका चोप्रा डिसेंबर २०१८ मध्‍ये निकसोबत लग्‍न केल्‍यानंतर मंगळसूत्र घातलेली दिसली होती. या जोडप्‍याच्‍या लग्‍नाला आता तीन वर्षे झाली आहेत आणि दोघेही लॉस एंजेलिसमध्‍ये त्यांच्या पॉश निवासस्थानी राहतात. प्रियांका अमेरिकेतही तिच्या इंस्टाग्रामवर भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे पालन करताना दिसते.

हेही वाचा :

हे देखील वाचा