Sunday, July 14, 2024

शबाना आझमींच्या घरी रेखा यांना पाहताच, तिथून निघून गेले होते अमिताभ बच्चन, वाचा ‘तो’ किस्सा

अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी आहे. दोघेही सिनेसृष्टीतील मोठे कलाकार आहेत. दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. दोघांशी संबंधित अनेक गोष्टी वर्षानुवर्षे चर्चेचा विषय बनत आहेत. यासिर उस्मानच्या ‘रेखा एक अनहिअर्ड स्टोरी’ या पुस्तकात या दोघांशी संबंधित एक किस्सा नोंदवला गेला आहे. अमर सिंग यांचा हवाला देऊन लेखकाने ही घटना सांगितली आहे.

एकदा शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत अमिताभ बच्चन त्यांचे मित्र दिवंगत अमर सिंग यांच्यासोबत पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर अमिताभ यांनी त्यांच्या ड्रायव्हरला जेवायला पाठवले. अमर सिंग यांच्या हवाल्याने पुस्तकात लिहिले आहे की, अमिताभ शबाना यांच्या घरात पोहोचताच त्यांनी रेखाही तिथे असल्याचे पाहिले. रेखा यांना पाहून अमिताभ मागे वळले आणि परत आपल्या गाडीकडे जाऊ लागले. अमर सिंग यांनी सांगितले की, रेखा यांना तिथे पाहून अमिताभ थोडे अस्वस्थ झाले. अमिताभ गाडीजवळ पोहोचले तेव्हा गाडी तिथे नव्हती. त्यांनीच ड्रायव्हरला जेवायला पाठवल्याले होते.

अमर सिंग यांच्या म्हणण्यानुसार, अमिताभ यांनी कार नसताना टॅक्सी बोलावली आणि तेथून ते थेट घरी गेले. अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्याबद्दल अनेक गोष्टी घडल्या आहेत. रेखा यांनी अनेकवेळा अमिताभ यांचे नाव न घेता इशारे करत आपले प्रेम व्यक्त केले आहे. अमिताभ यांनी याबाबत कधीच आपली प्रतिक्रिया दिली नाही.

रेखा यांनी १९९० मध्ये उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर काही वेळातच अभिनेत्रीला समजले की, त्यांचा नवरा मानसिकरित्या खालावलेला आहे. अशा परिस्थितीत रेखा यांनी पती मुकेशला सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांनी घर सोडले. पण यानंतर मुकेशने आत्महत्या केली. दोघांचे लग्न केवळ सात महिने टिकले, त्यानंतर रेखा आपले आयुष्य एकट्याच जगत आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा