आपल्या गाण्यांनी सोशल मीडियावर धमाल करणारी ढिंच्याक पूजा (Dhinchyak Pooja) तिच्या चाहत्यांसाठी एक नवीन गाणे घेऊन आली आहे. ढिंच्याक पूजाचे ‘आय ऍम अ बाइकर’ हे नवीन गाणे यूट्यूबवर रिलीझ करण्यात आले आहे. या गाण्यावर चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. पुन्हा एकदा ती तिच्या गाण्यामुळे चर्चेत आली आहे.
ढिंच्याक पूजाचे खरे नाव पूजा जैन आहे. पूजा पाच वर्षांपूर्वी तिच्या ‘सेल्फी मैने ले ली…’ या गाण्यासाठी यूट्यूबवर व्हायरल झाली होती. यानंतर तिने ‘स्वॅग वाली टोपी’ आणि ‘दिलों का शूटर’ सारखी गाणी गाऊन लोकप्रियता मिळवली. (dhinchyak pooja is back with her new i am a biker song)
ढिंच्याक पूजा स्वतःची गाणी लिहिते आणि गाते, तिच्या या खास वैशिष्ट्यामुळे तिने सोशल मीडियावर एक खास ओळख निर्माण केली आहे. आता वर्षाच्या पहिल्या महिन्यात, मिम्स बनवणाऱ्यांसाठी पूजा तिचे नवीन गाणे ‘आय ऍम अ बाइकर’ घेऊन आली आहे. व्हिडिओमध्ये ढिंच्याक पूजाने बाइकर आउटफिट आणि लेदर जॅकेट घातलेली दिसत आहे. बाईकवर बसलेली आणि दोन्ही बाजूंनी दुचाकीस्वारांनी घेरलेली ढिंचक पूजा गाताना दिसत आहे, “मैं बाइकर, कोई टायगर जैसा, मोटे थोड़ा डाएट कर, तू भी मुझे पसंद कर…” हे गाणे हिंदी आणि इंग्रजीत तालबद्ध करण्यात आले आहे.
ढिंच्याक पूजाचे हे गाणे यूट्यूबवर शेअर केल्यानंतर, दोन दिवसांतच या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यावर युजर्सने विविध वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “असं वाटतंय की, कानातून रक्त येत आहे.” दुसर्या युजरने लिहिले, “आज मी ढिंच्याक पूजाचे बाइकर गाणे ऐकले… आता माझ्या कानातून रक्त येत आहे.” आणखी एकाने लिहिले की, “ढिंच्याक पूजाने तिचे नवीन गाणे आय एम अ बाइकर रिलीझ केले आहे. आता आपल्याला दोन प्रकारच्या विषाणूंशी लढावे लागेल!” तसेच काहीजण तिचे कौतुक करतानाही दिसले.
हेही वाचा-