Tuesday, July 23, 2024

‘बिग बॉस’मधील करण आणि तेजस्वीच्या नात्याबद्दल करणच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया, ऐकून व्हाल हैराण

‘बिग बॉस १५’ मधील करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश एकमेकांच्या प्रेमात असलेले दिसत आहेत. दोघेही एकमेकांसोबत खूप खुश आहेत. अशातच असा प्रश्न उभा राहिला आहे की, करणच्या आई -वडिलांना करण आणि तेजस्वीचे हे नाते आवडेल का? तसेच यासोबत अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. अशातच त्यांच्या नात्याबाबत करणच्या परिवाराकडून प्रतिक्रिया आली आहे. जी ऐकून सगळेच हैराण होतील.

बिग बॉसच्या या आठवड्यात स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबाला भेटण्याची संधी मिळणार आहेत. अशातच एक प्रोमो समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये करण कुंद्रा त्याच्या आई-वडिलांना भेटत आहे. यावेळी तेजस्वी देखील त्याच्या आई-वडिलांना भेटताना दिसत आहे. यानंतर त्याचे वडील असे काही बोलतात जे ऐकून तुमचा अजिबात विश्वास बसणार नाही. (karan kundrra parents says tejasswi prakash is in heart of the family)

या प्रोमो व्हिडिओमध्ये दिसत आहे की, करण त्याच्या कुटुंबाला तेजस्वीला भेटवतो. त्यावेळी त्याचे वडील म्हणतात की, “आता ही आपल्या कुटुंबाच्या हृदयात आहे.” हे ऐकून करण खूपच खुश होतो तसेच तेजस्वीच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसतो.

या प्रोमोमध्ये आणखी दिसत आहे की, तेजस्वीच्या कुटुंबातील तिचा भाऊ व्हिडिओ कॉलसाठी येतो. यानंतर तेजस्वी देखील करणला तिच्या भावाला भेटवते. ती करणकडे इशारे करत म्हणते की, तुला हा पसंत आहे का? यावर तिचा भाऊ म्हणतो की, “हा खूप चांगला आहे. माझ्याकडून होकार आहे.” हे ऐकून तेजस्वी आणि करण दोघेही खूप खुश होतात. अजून आता या एपिसोडमध्ये काय होणार आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप खुश आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा