फँड्री’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेली ‘शालू’ म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात होय. राजेश्वरी आपल्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत येत असते. कधी हॉट, तर कधी साडीतील पारंपारिक फोटो शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असते. तिने नुकतेच तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्या फोटोमुळे सर्वत्र चर्चा चालू होती. त्यानंतर आता राजेश्वरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
शालूने ‘डोन्ट रश’ या गाण्यावर ट्रेंडिंग डान्स करून तिच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राजेश्वरी सोनेरी रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. तसेच तिने केस मोकळे सोडले आहेत. व्हिडिओमध्ये सुरुवातीला ती चालत येते आणि तिच्या हावभावासहित या गाण्यावर डान्स करते. विशेष म्हणजे तिने यावेळी पायात काहीच घातलेले नाही.
हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “वन मोर टाईम” तिचा हा व्हिडिओ प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. नेहमीप्रमाणेच सगळे तिला कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. तिच्या या व्हिडिओवर एका चाहत्याने केलेली कमेंट लक्षवेधी ठरत आहे. चाहत्याने लिहिले आहे की, “असे काही तरी तुम्ही नवीन टाकताय…त्यामुळे आज काळ्या चिमण्या दिसंना झाल्यात…. गल्ली गल्ली असंख्य जब्या निर्माण होत आहेत….आवरा राव थोडंसं.”
राजेश्वरीची फेसबुक पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा…
राजेश्वरीला काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. याची माहिती तिने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून दिली होती. कोरोनातून बरी होऊन परतल्यानंतर तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे.
राजेश्वरीचे फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. तिच्या सोशल मीडियावरील वावरामुळे ती खूप लोकप्रिय झाली आहे. राजेश्वरीने नागनाथ मंजुळे यांच्या ‘फँड्री’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. या एकाच चित्रपटाने तिला भरभरून ओळख दिली. त्यानंतर तिने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले आहे. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–अभिनेत्री बनूनही रिंकू राजगुरूने आजपर्यंत केले नाही ‘हे’ काम; तुम्हीही म्हणाल, ‘हे कसं काय बरं!’