लय भारी! भर उन्हात घराबाहेर पॅपराजींना कोल्ड ड्रिंक पाजताना दिसला सोनू सूद, पंतप्रधान बनण्याच्या प्रश्नावर दिली अशी प्रतिक्रिया

Sonu Sood speak up on being prime minister of India during give summer drink to media persons


मागील एक वर्षापासून भारत कोरोनाच्या कचाट्यात सापडला आहे. यावर्षी तर भारताची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. रुग्णांच्या संख्येसोबतच मृत्युदरही वाढत आहे. अनेक सोयी सुविधांचा अभाव जाणवत आहे. अनेकजण या संकटांतून भारताला बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत. परदेशातून देखील मदतीचा हात पुढे आला आहे. अनेक कलाकार देखील मदत करत आहेत. या सगळ्या परिस्थीत बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने सर्वाचा हात घट्ट पकडून ठेवला आहे. तो मागील एक वर्षापासून कोरोना रुग्णांना मदत करत आहे. अशातच सोनूने पॅपराजींना कोल्ड ड्रिंक देऊन त्यांच्याशी गप्पा मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

मंगळवारी (११ मे) सकाळी सोनू सूद घराच्या बाहेर जाताना स्पॉट झाला. पॅपराजींना वाटले की, तो कुठेतरी बाहेर निघाला आहे. परंतु तो त्यांनाच भेटायला बाहेर आला होता. या गरमीमध्ये थोडासा दिलासा देण्यासाठी सोनू पॅपराजींसाठी कोल्ड ड्रिंक घेऊन आला होता.

सोनू सूदने ड्रिंक देऊन या गरमीपासून थोडासा दिलासा दिला. त्यांनतर पॅपराजींनी त्याला विचारले की, ‘जनतेला तुम्हाला पंतप्रधान म्हणून बघायचे आहे. राखी सावंतला देखील असं वाटत की तुम्ही पंतप्रधान बनावे.’

या प्रश्नाचे सोनू सूदने अत्यंत मजेशीर अंदाजात उत्तर दिले की, “मी एक सामान्य माणूस म्हणूनच ठीक आहे. जर सामान्य माणूस राहिलो, तर तुमच्या सारख्या माझ्या अनेक भाऊ- बहिणींना मला भेटता येईल पण पंतप्रधान झालो तर ते शक्य होणार नाही.”

सोनू सूदला देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याने अवघ्या 7 दिवसात कोरोनावर मात केली होती. त्यानंतर तो पुन्हा देश सेवेसाठी सज्ज झाला होता. अनेक अपरिचित माणसे देखील त्याच्याकडे मदतीची मागणी करतात. शक्य असेल तेवढ्या सगळ्यांना तो मदत करण्याचा प्रयत्न करत असतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अमिताभ बच्चन यांच्या बालपणीचे पात्र साकारून नाव कमावणारा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झाला अचानक गायब, आता करतो तरी काय?

-पत्नी आणि मुलींच्या जवळ राहण्यासाठी रणधीर कपूर होणार नवीन घरात शिफ्ट, आपल्या जुन्या घराबाबत उघड केले ‘हे’ गुपीत

-राधे चित्रपटातील किसींग सीनबाबत दिशा पटानीचा मोठा खुलासा, म्हणाली…


Leave A Reply

Your email address will not be published.