Friday, December 1, 2023

‘तुझ्याकडे एकच ड्रेस आहे का?’ राजेश्वरीच्या व्हिडिओवर नेटकऱ्याची कमेंट; अभिनेत्री म्हणाली, ‘अजून 15 दिवस…’

‘फॅण्ड्री’ चित्रपटात शालूचे कॅरेक्टर आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. शाळेत जाणारी, आपल्या विश्वात रमणारी, सालस आणि सुंदर अशा शालूने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. शालूचे पत्र साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती अभिनेत्री राजेश्वरी खरात आहे. राजेश्वरीने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे.

राजेश्वरी (Rajeshwari Kharat video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर पोस्ट करत असते. राजेश्वरीच्या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. राजेश्वरीचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. राजेश्वरीने नुकताच एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

Rajeshwari Kharat video

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये राजेश्वरीने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. या व्हिडिओमध्ये राजेश्वरी ‘चुप चुप के’ या चित्रपटातील सोनू निगमने गायलेलं ‘मौसम है बडा कातील’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर नेटकर्‍यांनी अनेक कमेंट केले आहेत.

 या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “तुझ्याकडे एकच ड्रेस आहे का? “ युजरच्या या कमेंटला उत्तर देत राजेश्वरीने लिहिले की, “हो एकच आहे आणि मला दुसरा ड्रेस नकोय अजिबात, अजून पंधरा दिवस हा ड्रेस घालणार काय मग आता???” राजेश्वरीने दिलेल्या या उत्तराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटातून 2013 साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यानंतर तिने 2017साली ‘आयटमगिरी’ या चित्रपटात झळकली. (Actress Rajeshwari Kharat dance video goes viral on social media)

अधिक वाचा-
काळीज तोडणारी बातमी! बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिकेचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
नटसम्राट झाला पोरका! प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या आईचं दुःखद निधन

हे देखील वाचा