संगीत क्षेत्रातून एक काळीज तोडणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध जेष्ठ गायिका मालिनी राजूरकर यांचे बुधवारी (6 सप्टेंबर) वृद्धापकाळाने दु:खत निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. मालिनी मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. हाती आलेल्या वृत्तांनुसार, त्यांना मंगळवारी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल. बुधवारी दुपारी 4च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशात त्याच्या निधनामुळे कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या निधनावर चाहत्यांसोबतच कलाकारही शोक व्यक्त करत आहेत.
मालिनी राजूरकर (malini rajurkar) याच्या निधनामुळे संगीतसृष्टी सध्या शोकसागरात आहे. इंडस्ट्रीत त्याच्यासोबत काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी हे वैयक्तिक नुकसान असल्याचे म्हटले आहे. त्यांचे पार्थिव हैद्राबाद येथील त्यांच्या निवास्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. ग्वाल्हेर घराण्यातील राजूरकर यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
राजूरकर यांचा जन्म 8 जानेवारी 1941 मध्ये अजमेर, राजस्थान येथे झाला. जिथे त्यांनी त्यांची सुरुवातीची वर्षे घालवली. गणितात पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अजमेर येथील सावित्री गर्ल्स हायस्कूल आणि कॉलेजमध्ये तीन वर्षे गणिताचे शिकवले. नंतर त्यांनी तीन वर्षांची कलेत शिष्यवृत्ती मिळवली. त्यानंतर त्यांनी संगीताचा पाठपुरावा केला. गोविंदराव राजूरकर आणि त्यांचे पुतणे वसंतराव राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अजमेर संगीत महाविद्यालयातून संगीताचे धडे घेतले. पुढे त्यांचा विवाह वसंतराव राजूरकर यांच्याशी झाला.
मालिनी राजूरकर ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजूरकर यांचे टप्पा व तराणा गायकीवर विशेष प्रभुत्व होते. मालिनी राजूरकर यांनी उपशास्त्रीय तसेच, नाट्यगीतगायनही केले होते. पांडुनृपती जनक जया, नरवर कृष्णासमान ही त्यांची नाट्यगीते रसिकांच्या मनात घर करून बसली. राजूरकर यांनी देश-विदेशांत अनेक मैफली चांगल्याच गाजवल्या होत्या. पुण्यातील प्रसिद्ध सवाई गंधर्व महोत्सवासह, मुंबईतील गुणीदास संमेलन, हृदयेश फेस्टिव्हल, ग्वाल्हेर येथील तानसेन समारोह, दिल्ली येथील शंकरलाल फेस्टिव्हल यामध्ये त्यांनी अनेक वेगवेगळ्या कला सादर करत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले होते.
अधिक वाचा-
–वडिलांच्या श्रीमंतीला लाथ मारून जेनिफर केंडलने केलेला शशी कपूर यांच्याशी पळून जाऊन विवाह
–साऊथचे ‘अंबानी’ म्हणून ओळखले जातात मामूट्टी, वकिली सोडून धरली होती अभिनयाची कास